लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त गडचांदूर इथे व्याख्यान कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता… तिलक पाटील यांनी आपल्या व्याख्यानामधून शिवाजी महाराजांच्या काळातला मावळा आणि आजचा मावळा यामधील तफावत सांगीतली.. छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांचा मानसन्मान करणारा जाणता राजा म्हणून आपण ओळखतो .. त्या काळचे मावळे स्त्रियांचा रक्षणकर्ता मावळा होता मग ती कोणत्याही जातीची असो वा पंथाची यांच्यात कधीच भेदाभेद करत नव्हते पण माञ आजची परिस्थिती भयानक आहे आज आमच्या आई बहिणी ह्या स्वंतत्र पणे बाहेर समाजात वावरू शकत नाही ही फार मोठी आजची शोकांतिका आहे आज युवा तरूण गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो असतो महाराजांना आपला बाप मानतात पण माञ त्यांचें विचार अंगीकृत करीत नाही एखादे महाविद्यालय सुटले की त्या महाविद्यायातून घरी जाणाऱ्या मुलींना छेडछाड करणे गाडीचा आवाज वाढवीत , गाडीचे चाके वर उचलतात जोरजोरात हॉर्न मारतात त्यांची छेडखानी करतात आणि स्वतःला शिवाजी महाराजांचा मावळा समजतात किती लाजिरवाणी बाब आहे हे आजच्या युवा तरूण पिढीला ज्ञात झाले पाहिजे ,असे छत्रपती शिवाजी महाराजाचे फोटो डोक्यावर घेउन नाचन्यापेक्षा त्यांचें विचार अंगीकृत करा असेही व्याख्यान्यातून तिलक पाटील यांनी सांगितले. त्यावेळी मंचावर गडचांदूरच्या नगराध्यक्षा सौ सविताताई टेकाम, माजी उपाध्यक्ष सचिन भोयर नगरसेविका एकरें , ताजने, गोरे ,संतोष महाडोळे ,प्रहारचे सतीश बिडकर व पत्रकार व नागरिक वर्ग उपस्थित होते..