लोकदर्शन 👉 मोहन भारती।
⭕६२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
●३१० पेक्षा अधिक रुग्णांनी घेतला मोफत आरोग्य शिबिराचा लाभ
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन वाइल्डलाइफ इनवारमेन्ट कॉन्झरवेशन नेचरिंग फाउंडेशन गडचांदुर व GMPA असोशिएशन , न.प.गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडचांदूर येथे
भव्य रक्तदान शिबिर, व रक्तदात्याचा सत्कार सोहळा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले . गरजू रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये हा उद्देश समोर ठेऊन सामाजिक बांधीलकी जोपासत रक्तदान शिबिराचे व रक्तदात्यांचा सत्कार सोहळाचे आयोजन करण्यात आले .
रक्तदान शिबिराचे उद्घाटन गडचांदूरच्या नगराध्यक्षा सविता टेकाम यांच्या शुभहस्ते करण्यात आले , या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी डॉ .के.आर.भोयर होते. विशेष अतिथी म्हणून, न.प.चे माजी उपाध्यक्ष सचिन भोयर, नगरसेवक राहुल उमरे,अरविंद मेश्राम नगरसेविका कल्पना निमजे,डॉ, माधवराव केंद्रे,डॉ, कुलभूषण मोरे,डॉ,लोनगाडगे ,डॉ. जयदीप चटप,समाजसेवक मनोज भोजेकर, व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात ६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले, अमूल्य योगदान देणाऱ्या रक्तदान करणाऱ्या ६२ रक्तदात्याचा व शासकीय रक्तपेढी येथील डॉक्टरांचा सत्कार करून सन्मानित करून शिवजयंती साजरी करण्यात आली .
उपक्रम कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी वि कॅन फाऊंडेशन गडचांदूर व जी एम पी ए असोसिएशने विशेष मेहनत घेतली.
यावेळी वाइल्डलाइफ इनवारमेंट काँझरवेशन नेचरिंग फौंडेशन व जी एम पी ए अससोसिएशनचे सर्व टीम व नागरिक उपस्थित होते.आमदार सुभाष धोटे यांनी या संस्थेचे कौतुक केले आहे.