लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना :– जाणता राजा युवा मंडळ तथा समस्त ग्रामस्थ यांच्या सौजण्याने खिरडी येथे शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी मुख्याध्यापक विलास कुडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून शिवाजी महाराजांचे विचार व कार्याची यशोगाथा सांगितली. तर अध्यक्षीय मार्गदर्शनातून शंतनु धोटे यांनी शिवाजी महाराजांचे विचार मुलामध्ये रुजविणे गरजेचे आहे. शिवजयंती उत्सव आयोजनातून नवीन पिढीला महाराजांचे महतकार्य कढण्यास मदत होते. याच भुमिकेतून खिर्डी येथील विद्यार्थ्यांसाठी येथे शिव ग्रंथालय उभारण्यात येणार आहे तसेच आरोह प्लांटचे काम लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती दिली. या प्रसंगी अरविंद बावणे यांनी शिवगर्जना दिली व केशरी झेंडा दाखवून गावामधून शिवमिर्वणुक काढण्यात आली.
या प्रसंगी शुभांगीताई धोटे, वृषालिताई धोटे, रोहिणीताई धोटे, शंतनु धोटे, मुख्याध्यापक विलास कुडे, माजी सरपंच अनुसया कोटनाके, पोलीस पाटील रामदास तोडासे, तमुस अध्यक्ष धनराज मालेकर, शिवराम तुरणकर, सुभाष वायकोर, देविदास ढवस, वामन सत्रे, बंडू, शेरकी, नत्थु मालेकर, वासुदेव कुडे, आनंदराव शेरकी , किशोर गोहने, बापूराव नागोसे, प्रफुल मांडवकर, ईश्वर पाल, राकेश बोटपल्ले, प्रलय शेरकी, वसंता शेरकी, गोलू गाताडे, सुमित शेरकी, राहुल मुकके, भिवसन कुभरें, वैभव वायकोर, शेखर ढवस, कपिल गोहने, सूरज गोहने, विठ्ठल कोरडे, प्रफुल हिवरकर, अमोल हिवरकर, पुनीत राऊत, कवडू मानुसमारे, अमोल गायकवाड, नवनाथ मडावी, शंकर मडावी, मारोती आंबटकर, सुनील हिवरकर, नंदू ढवस श्रीकांत ढवस, राजू लालसरे, शुभम बावणे, वैभव चापले, शुभम चापले, शिवम चापले, उत्तम शेरकी, प्रदीप मालेकर, यश माळेकर, प्रभाकर मांडवकर यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन धनराज मालेकर यांनी केले.