लोकदर्शन 👉 मोहन भारती
*⭕ठाणेदार सत्यजित आमले यांनी केले उद्घाटन*
गडचांदुर (ता. प्र.) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त प्रहार च्या वतीने १९ फेब्रुवारी ला सकाळी ११.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, गडचांदूर येथे मोफत ई-शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कर्यक्रमाचे उदघाटन गडचांदूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी केले तर अध्यक्ष स्थानी गडचांदूरच्या नगराध्यक्ष,सविताताई टेकाम होत्या, याप्रसंगी नगर सेविका उपस्थित होत्या तसेच शिवसेना चे राजू कादरी, अक्षय गोरे , उपस्थित होते कार्यक्रमाला प्रहारचे माजी तालुका अध्यक्ष सतीश बिडकर, पंकज माणूसमारे, शैलेश विरुटकर, सागर गुडेल्लीवर, इंजि अरविंद वाघमारे , प्रतीक खैरे ,तथा इतर कार्यकर्ते उपस्थित होते
त्यात 27 श्रमिकांच्या ई-श्रम ची नोंदणी करून त्यांना कार्ड देण्यात आले.
बिडकर यांनी सांगितले की कुणाला ई-श्रम कार्ड काढायचे असल्यास त्यांनी प्रहार कार्यालयात येऊन काढून घेणे व नेहमी असेच समाज उपोयोगी शिबीर राबवून राज्यमंत्री बच्चू कडू यांचा आदर्श निर्माण करण्यण्याचा प्रयत्न राहील.
सरकारने असंघटीत कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देतांना येणाऱ्या अडचणी यासाठी या कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे. हे कार्ड काढून देण्यासाठी कामगारांच्या अज्ञानतेचा फायदा घेत शेकडो रुपये घेतल्या जात आहे. ही लुट थांबविण्यासाठी बिडकर यांच्या संकल्पने नुसार मोफत नोंदणी शिबीर प्रहार मार्फत राबविण्याचे ठरले होते यात अनेक श्रमिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
लवकरच बांधकाम कामगारांसाठी त्यांच्या योजना व सुरक्षा याबाबत एक मोठे शिबीर घेण्यात येणार आहे असेही बिडकर यांनी सांगितले.