लोकदर्शन👉औरंगाबाद (प्रतीनिधी) राहुल खरात सर
महिलांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे. निर्भीडपणे समोर येऊन अन्यायांचा प्रतिकार केला पाहिजे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी केले.
ते बीबी फातेमा लोकसंचालित साधन केंद्र औरंगाबादच्या वतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले कीं, महिलावरील अन्याय अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. ही बाब गंभीर जरी असली तरी महिलांनी घाबरून न जाता सक्षमपणे संकटाचा मुकाबला केला पाहिजे. अनेक वेळा न्यूनगंडापोटी महिला बोलत नाही. बदनामीच्या भीतीने त्या बोलत नाही नेमकी हीच बाब अन्याय होण्यासाठी कारणीभूत असते. आरोपी त्याचा फायदा घेतात. म्हणून महिलांनी निसंकोचपणे आपल्या वरील अन्याय अत्याचार संबंधी आपल्या घरातल्या व्यक्तींना, मैत्रणीना किंवा पोलीसांना सांगितलं पाहिजेत. या विषयी महिला, मुलीना समुपदेशन, जागृती होणे गरजेचे आहे.अनेक वेळा आमिष दाखवून फसवणूकिचे प्रकार समोर येतात. अशावेळी महिलांनी, मुलींनी कुठल्याही अमिषाला बळी न पडता प्रगल्भ होण्याची गरज आहे असेही ते म्हणाले. यावेळी संस्थेच्या व्यवस्थापक शारदा काळवे यांनी संस्थेच्या जनकलल्यानकारी योजनाबाबत माहिती दिली त्या म्हणाल्या, महिला सबलीकरनासाठी या संस्थेच्या वतीने बेरोजगार महिलांना रोजगार विषयी जागृत करून प्रशिक्षण दिले केली जाते. विविध शिबीर राबविले जातात. दरवर्षी विविध प्रकारचे विविध विषयावर प्रशिक्षण दिले जाते. त्या माध्यमातून रोजगार कसा मिळेल यां विषयी तज्ञाकडून मार्गदर्शन करून महिलाना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केले जातात. मागासवर्गीय महिला, आर्थिक दुर्बल घटकातील महिलांचे बचत गट स्थापन करून बचतगटा मार्फत विविध बँकाकडून अनुदान तथा कर्ज उपलब्ध करून दिले जाते. कोरोना महामारीच्या काळात देखील अनेक गोरगरिबांना संस्थेकडून तयार अन्नधान्य वाटप केले. महिलाना शिवणकाम, पॅनकार्ड बनविणे, सक्षम सुदृढमाता बालक स्पर्धा, नेत्र तपासणी, पूरक पोषण आहार, पिको फॉल मशीन, शिलाई मशीन, कटिंग टेबल, कापडी पिशवी शिवणे,असे विवीध उपक्रम यां संस्थेच्या वतीने राबविले जातात अशी माहिती यां संस्थेच्या व्यवस्थापक शारदा काळवे यांनी दिली. याप्रसंगी पत्रकार,रतनकुमार साळवे, प्रवीण बनकर, नागमणी भुरेवार,मोहंम्मद पटेल, सुदाम तुपे, कवित्ता लोखंडे, प्रज्ञा मोरे, संगीता धावरे, सरिता गडपकर, रेखा राजभोज, रफिया पटेल, मंगल सुरडकर, रुपाली बोर्डे, कटारे, गालफाडे, शेंगदाणे, नर्गिस शहा याची उपस्थिती होती.