लोकदर्शन,सांगली दि 19👉राहुल खरात
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सांगली यांच्या वतीने बहुजन प्रतिपालक कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची 392 वी जयंती विश्वशांती बुद्ध विहार श्रमिक नगर सांगली या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जिल्हा पदाधिकारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा कोषाध्यक्ष संजय कांबळे यांनी केले यानंतर जिल्हा सचिव संस्कार विभाग सुजित कांबळे यांनी मार्गदर्शन केले व अध्यक्षीय मनोगत जिल्हा सरचिटणीस रतन तोडकर यांनी केले ते म्हणाले ‘छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते आपल्या राज दरबारामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तींना त्यांनी संधी दिली आपल्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची जातिभेद कोणत्याही प्रकारच्या अनिष्ठ रूढी परंपरा व अंधश्रद्धा न मानणारा विज्ञानवादी व परिवर्तनवादी एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.’ कार्यक्रमाचे आभार हिरामण भगत यांनी मानले या कार्यक्रमास रतन तोडकर, संजय कांबळे , सुजित कांबळे विशाल कांबळे, सुहास धोतरे,सहदेव कांबळे , नितीन सरोदे, सुहास कांबळे अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ सांगली जिल्हा अध्यक्ष संजय भुपाल कांबळे हिरामण भगत दिक्षित कुमार भगत किरण कवडे, रुपेश ढेरे यशोदामाई बलखंडे ,भारतीताई भगत ,प्रियांका ताई धुळे भगत, व बलखंडे परिवारातील सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.