लोकदर्शन 👉 राहुल खरात सर
*⭕तालुका ग्रंथालयास विद्यार्थ्यांनी दिली भेट पुस्तकात रमले विद्यार्थी***
आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पलूस येथील जिल्हा परिषद शाळा नं.२ मध्ये अनोख्या पद्धतीने शिवजयंतीउत्सव साजरा करण्यात आला.या निमीत्ताने शाळेत विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी सर्वप्रथम छत्रपतींच्या प्रतिमेस शाळेच्या वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ उज्वला पाटील यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पोवाडे, गाणी,भाषणे,घोषणा यातून छत्रपतींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.त्यानंतर शाळेचे उपक्रमशील शिक्षक मारुती शिरतोडे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महारांजांच्या जयंतीचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यानी पलूस येथे असणाऱ्या अ दर्जाच्या स्वामी विवेकानंद तालुका वाचनालयास भेट दिली. यावेळी वाचनालयात उपलब्ध असणारी 26000 पुस्तके सुव्यवस्थित ठेवलेली कपाटे,विविध दैनिके, मासिके साप्ताहिके यांचे निरीक्षण विद्यार्थ्यांनी केले. तसेच काही पुस्तके स्वतः हाताळून विविध पुस्तकांची नावे वहीत लिहून घेतली.यावेळी स्वामी विवेकानंद वाचनालयाचे उपाध्यक्ष सतीश पवार, कोषाध्यक्ष पांडुरंग पुदाले, ग्रंथपाल सौ. उमा पुदाले, सहाय्यक ग्रंथपाल सोपान डोंगरे,श्रीराम कुलकर्णी सुरज शिंदे सह विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना मारुती शिरतोडे म्हणाले की साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी करताना ज्याचे किल्ले किल्ले त्याचे राज्य अशी संकल्पना मांडून शत्रूशी लढताना अनेक प्रकारच्या युकत्या वापरल्या होत्या. परंतु आताच्या आधुनिक काळात प्रत्येक माणसाने आपला मुख्य शत्रू कोण हे ठरवताना स्वतः प्रगल्भ होण्यासाठी अगोदर आपली पावले ग्रंथालयाकडे वळवणे आवश्यक आहे. विविध प्रकारची पुस्तके वाचून ज्ञान संपादन करणे,यातून आपले आयुष्य सुंदर करणे,समाज सुधारणेच्या कामात आपला वाटा उचलणे या गोष्टी होण्यासाठी बालपणापासूनच विद्यार्थ्यांना वाचनालयात जाण्याची सवय लागली पाहिजे.समृद्ध ग्रंथालये कशी असतात याचे दर्शन विद्यार्थ्यांना घडवले पाहिजे या उद्देशाने आज अ दर्जाचे असणारे पलूसचे स्वामी विवेकानंद तालुका वाचनालयास भेट दिली.वाचनालयात विद्यार्थी पुस्तकात रमले.यावेळी शाळेतील शिक्षक संभाजी पाटील, जगन्नाथ शिंदे, शिक्षिका सोनाली चव्हाण, शैलजा लाड,सौ. जाधव आदी उपस्थित होते. शिवजयंतीच्या निमीत्त शाळेने राबविलेल्या अनोख्या उपक्रमाबद्दल पालकांनी शाळेचे कौतुक केले.कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मारुती शिरतोडे यांनी केलेतर आभार सोनाली चव्हाण यांनी मानले.