लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕गडचांदूर येथे शिवजयंती निमित्त मोफत रोगनिदान आणि रक्तदान शिबीराचे आयोजन.
कोरपना :– जनरल मेडिकल प्रॅक्टिसनर असोसिएशन गडचांदूर , वाइल्डलाइफ इन्व्हरमेंट कंजर्वेशन नेचर इन फाउंडेशन गडचांदूर, आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे आणि नगर परिषद गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमानाने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गडचांदूर येथे मोफत रोगनिदान आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या दोन दिवसीय शिबिराचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी दैनंदिन जीवनात आरोग्याची काळजी प्रत्येकच व्यक्ती घेत असतो मात्र अनेकदा काही कारणाने काहीसे दुर्लक्ष होत असते मात्र अशा प्रकारच्या मोफत रोगनिदान शिबिरात नागरिक सहभागी होऊन स्वतःची काळजी घेतात. त्यामुळे अनेकांना या शिबिराचा लाभ होतो तर कोरोना संकट असेल किंवा अन्य कोणतेही कारण असो रक्तदानाची कायमच आवश्यकता भासते तेव्हा रक्तदान शिबीर आयोजित होणे काळाची गरज आहे. अशा प्रकारचे शिबीर आयोजित करून खऱ्या अर्थाने मानव सेवेचे महत कार्यच संपन्न होत आहे. याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी नगराध्यक्षा सविता टेकाम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थिपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे, नगरसेविका कल्पनाताई निमजे, नगरसेवक विक्रम येरणे, राहुल उमरे, जयश्री ताकसांडे, रामसेवक मोरे, गडचांदूर व्यापारी अशोसीएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी, पोलीस निरीक्षक सत्यजित आमने, यु. काँ. अध्यक्ष शैलेश लोखंडे, सं गां नि योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर, आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे चे डॉ. विवेक लहाने, डॉ. ओजस महाजन, डॉ. पवार, जिल्हा समन्वयक डॉ. सत्यजित पोद्दार, जनरल मेडिकल प्रॅक्टिसनर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. प्रदीप खेकडे, उपाध्यक्ष डॉ प्रदीप ठाकरे, सचिव डॉ कुलभूषण मोरे, कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण लोगाडगे, विकॅन चे अध्यक्ष प्रितेश मत्ते, वैभव राव, प्रणित अहिरकर, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कुलभुषण मोरे यांनी केले तर संचालन आणि आभार प्रदर्शन दीपक खेकारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरील सर्व संस्थांच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात स्थानिक नागरिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.