लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– *आता राबवु जलनीति नको काळाची भीती* ह्या ऊक्ति प्रमाणे ईनरव्हिल क्लब ऑफ राजूरा यांच्या तर्फे कळमना या गावाला भेट देऊन येथील वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच “पाणी जिरवा पाणी साठवा” हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याने कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या माध्यमातून सर्व क्लब मेंबर्स नी वॉटर हार्वेस्टिंग बद्द्ल सविस्तरपणे माहिती जाणून घेतली.
या प्रसंगी गावात उत्तमरीत्या वाॅटर हार्वेस्टिंग सिस्टीम राबवित असल्यामुळे ईनरव्हिल क्लब ऑफ राजूराच्या वतीने सरपंच, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या प्रास्ताविका मध्ये आम्ही आमच्या घरी सुद्धा ही योजना राबवू तसेच इतरांनाही सांगू असे आश्वासन ईनरव्हिल क्लब ऑफ राजूरा च्या अध्यक्षा स्वरूपा झंवर यांनी दिले. या प्रसंगी ईनरव्हिल क्लबच्या शुभांगी वाटेकर, कल्याणी गुंडावर, नेहा चिल्लावार, प्राची चिल्लावार, स्मिता बोनगिरवार, आसावरी बोनगिरवार, अर्चना शिंदे, रोशनी झंवर, कळमनाचे जेष्ठ नागरिक महादेव पिंगे, दत्ता पिंपळशेंडे, पुंडलिक पिंगे, धोंडुजी सुमटकर, नामदेव विद्दे, मारोती मुसळे, मनोहर कावडे अतुल अतकारे, संदीप गिरसावळे, शशिकला वाढई, शकुंतला पिंगे, बयाबाई ताजने, विठ्ठल नागोसे यासह स्थानिक नागरिक उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे संचालन शुभांगी वाटेकर यांनी केले, स्वागत गीत प्राची चिल्लावार यांनी गायले, तर आभार राधिका धनपावडे यांनी मानले.