“मुलीला लग्न चांगलंच मानवलेलं दिसतंय” असं म्हणण्यामागचं खरं कारण..

 

लोकदर्शन 👉संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973

लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा आणि जीवनाला कलाटणी देणारा टप्पा आहे. आईकडे असताना अतिशय स्वछंदी असणारे मुलींचे वागणे, लग्नानंतर काही मर्यादांमध्ये गुरफटून जाते. मुली लग्नानंतर स्वतःपेक्षा जास्त इतरांचा, घरच्यांना विचार करायला लागतात.

आपण अनेकदा लोकांना बोलताना ऐकले असेल, की अरे तुमच्या मुलीला लग्न चांगलेच मानवलेले दिसते. लग्नानंतर तिचे वजन वाढले आहे. पण लग्नानंतर असे काय होते की मुलींचे वजन वाढायला लागते. लग्नाआधी उत्तम फिगर राखणाऱ्या मुलीसुद्धा लग्नानंतर अचानक कशा जाड होतात. काय आहे यामागचे कारण.

आहारातील बदल…
लग्नाआधी मुली त्यांना पाहिजे तसे हेल्दी डाएट फॉलो करत असतात. मात्र लग्नानंतर असे डाएट फॉलो करणे त्यांना शक्य होतेच असे नाही.

याशिवाय खाण्याच्या पद्धतींमध्ये देखील फरक पडतो. आईकडे असताना मुलींच्या शरीराला आणि पचन क्रियेला विशिष्ट प्रकारचे अन्न पचवायची सवय झाली असते.

लग्नानंतर मात्र अचानक आहारात झालेले बदल स्वीकारण्यासाठी पचन क्रियेला वेळ लागतो. त्यामुळे देखील वजन वाढते. शिवाय लग्नानंतर घरच्यांकडे लक्ष देण्याच्या नादात मुली स्वतःकडे आणि आहाराकडे दुर्लक्ष करतात.

मेटाबॉलिक रेटची कमतरता…
आजच्या काळाचा विचार करता मुलामुलींचे लग्नाचे वय हे २८-३० असे असते. कधी कधी तर ३० पेक्षा जास्त देखील वय होते. अशावेळेस मुलींच्या शरीरात मेटाबॉलिक रेट कमी होण्यास सुरुवात झाली असते. त्यामुळे अगदी थोडे जरी खाल्ले तरी लगेच वजन वाढते. लग्नानंतर वजन वाढीचे हे देखील एक मुख्य कारण आहे.

फिटनेसबाबतची उदासीनता…
लग्नापूर्वी मुलींवर घरच्यांचा, बाहेरच्यांचा सुंदर आणि रेखीव दिसण्यासाठी दबाव असतो. त्यामुळे मुली न चुकता त्यासाठी प्रयत्न करतात. मात्र लग्नानंतर हा दबाव कमी होतो आणि मुली देखील आता लग्न झाले कोण बघणार आहे या विचाराने व्यायाम कमी किंवा बंदच करतात.

तणाव…
लग्नानंतर मुलींवर अचानक खूप जबाबदाऱ्या येतात. जर मुली वर्किंग असतील तर त्यांना ऑफिसचे काम, घरची जबाबदारी यामुळे मुली हळूहळू तणावाखाली येतात.

शिवाय मुलींना ऑफिसमध्ये पण चांगलेच काम करायचे असते आणि घरी देखील त्यांना उत्तम काम करायचे असते या तारेवरच्या कसरतीमुळे मुली अनेकदा तणावाला बळी पडतात.

प्रेग्नंसी…
लग्नानंतर साधारण १/२ वर्षांनी कपल फॅमिली प्लॅनिंग करतात. मुलींचे वजन वाढण्याचे प्रेग्नेंसी हे मुख्य आणि महत्त्वाचे कारण असते. बाळाच्या जन्मानंतर महिला त्यांच्याकडे लक्षच देऊ शकत नसल्याने त्यांचे वजन वाढत असते.

झोप न होणे…
लग्नानंतर सकाळी लवकर उठून दिवसभर काम आणि घरच्यांना सांभाळताना महिलांना झोप देखील मिळत नाही. घरात सर्वांच्या आधी उठून सर्वात उशिरा झोपणे यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. हे सुद्धा वजन वाढीचे एक कारण आहे.

लग्नानंतर मिळणारे प्रेम…
नवीन नवरी असल्याने मुलीला सगळीकडूनच भरभरून प्रेम मिळत असते. शिवाय चांगले चांगले पदार्थ देखील तिला खायला मिळतात यांमुळे देखील वजन वाढते.

हॉर्मोनल बदल…
मुली लग्नानंतर त्यांच्या सेक्स जीवनात ऍक्टिव्ह होतात आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात खूप हॉर्मोनल बदल होण्यास सुरवात होते. या बदलांमुळे देखील वजन वाढते.

फक्त महिलांसाठी राखीव असलेल्या सत्यम् शिवम् सुंदरम् आणि पुरुषांसाठी राखीव असलेल्या आपले आरोग्य ग्रुप साठी.
संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *