लोकदर्शन👉 मोहन भारती
कोरपना :– आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते कोरपना तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार आमदार धोटे यांच्या प्रयत्नाने मंजूर विविध विकासकामांचा शुभारंभ आज करण्यात आला. परिसरात होत असलेल्या विकासकामांमुळे स्थानिक नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. तर क्षेत्रात सातत्याने विकासकाम कामे पूर्ण करण्यासाठी आपण विशेष प्राधान्य देणार असून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार अशी ग्वाही आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिली आहे.
या प्रसंगी मौजा खिर्डी येथील गावालगतच्या नाल्यापासून ते राजेंद्र नालेकर यांचे घरापर्यंत रस्त्याचे दोन्ही बाजुनी पेव्हिंग ब्लॉक बसविणे तसेच परिसर सुसज्ज करणे ५० लक्ष, मौजा माथा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत अन्न धान्य साठवण (गोडाऊन) इमारत बांधकाम करणे २८ लक्ष , नक्षलग्रस्त निधीअंतर्गत स्मशानभूमीचे बांधकाम करणे ५ लक्ष रुपये, ४ मौजा वनसडी येथील गावालगतच्या नाल्यावर संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे तसेच स्मशानभूमी जवळील जागेचे सुसज्जीकर करणे व बसस्थानक ते दारासिंग राठोड यांचे घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसविणे ६० लक्ष , मौजा वनसडी येथे जलशुद्धीकरण यंत्र बसविणे १६ लक्ष, मौजा गडचांदूर जुनीवस्ती येथील ऐतिहासिक बुद्धभुमी जवळील परिसरात वाचनालयाचे बांधकाम करणे तसेच परिसर सुसज्ज करणे १ कोटी रुपये निधी च्या विविध विकासकामांचा समावेश आहे.
या प्रसंगी जि. प. सदस्या कल्पनाताई पेचे, विणाताई मालेकर, उपसभापती सिंधुताई आस्वले, नगराध्यक्षा सविता टेकाम, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, माजी सभापती तथा प स सदस्य श्यामभाऊ रणदिवे, माजी उपसभापती तथा प स सदस्य संभाजी कोवे, माजी जि प सदस्य उत्तमराव पेचे, सिताराम कोडापे, जेष्ठ नेते सुरेश पा. मालेकर, न प गडचांदूर काँग्रेस गटनेते विक्रम येरणे, आरोग्य सभापती राहुल उमरे, महिला व बालकल्याण सभापती अर्चनाताई वांढरे, नगरसेवक पापय्या पोनलवार, अरविंद मेश्राम, नगरसेविका अश्विनी कांबळे, यु. काँ. माजी विधानसभा अध्यक्ष आशिष देरकर, यु. काँ. तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे, सं गां नि योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर, शहराध्यक्ष संतोष महाडोळे, ग्रा. प सदस्य मिलिंद ताकसांडे, राजाभाऊ गटलगट, कृ.उ.बा.स संचालक भाऊजी चव्हाण, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष ललिताताई गेडाम, यु. काँ. महासचिव विलास मडावी, भास्कर जोगी, बाळकृष्ण कुंभारे, इरफान शेख रुपेश चुदरी, प्रा. हेमचंद्र दुधगवळी, प्रा. खैरे, गौतम भसारकर यासह कांग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.