लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर-
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना चे नवनियुक्त पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद चंद्रपुर च्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेऊन आरोग्य सहाय्यीका व आरोग्य सेविका यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
नुकतीच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना ची चंद्रपुर जिल्हा नविन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. या कार्यकारिणी बैठकीत आरोग्य सहाय्यीका व आरोग्य सेविका यांच्या मागील एक वर्षा पासून प्रलंबित असलेल्या मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली होती. याच अनुषंगाने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली शेट्टी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेतली. या दरम्यान संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा परिचय देत मागण्यांचे निवेदन ही देण्यात आले . मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली शेट्टी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत प्रलंबित मागण्यांकरीता लवकरच चर्चा करण्यासाठी संघटनेला वेळ दिला जाईल व प्रलंबित मागण्या लवकरच मार्गी लागतील अशी हामी दिली.
या वेळेस संघटनेच्या अध्यक्षा गिताताई खामनकर, सचिव रंजना कोहपरे,जिल्हा उपाध्यक्षा सुनिता घडसे, जिल्हा संघटक आशा नक्षीने,जोत्सना खिरडकर, जिल्हा सल्लागार दुर्गा गेडाम,लता घोरुडे, पंचाशिला मेश्राम, अलोने सिस्टर, टेकाम सिस्टर व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.