हिंदी इंग्रजी नाही तर चक्क संस्कृतमध्ये कित्येक वर्षं केस लढणारा एकमेव भारतीय वकील!* 

लोकदर्शन👉संकलन सुरेखा नेसरीकर कोल्हापूर 9028261973

 

मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का? की जगात एकूण किती भाषा बोलल्या जातात…नाही ना? तर जगात जवळपास ६९०० भाषा बोलल्या जातात. भाषा हे आपल्यासाठी व्यक्त होण्याचे माध्यम आहे. भाषेमुळे आपण आपल्या भावना, विचार समोरच्या व्यक्तिपर्यंत पोहोचवू शकतो. आपल्या जगण्यासाठी भाषा महत्वाची आहे. या भाषांमधील एक महत्वाची भाषा आहे संस्कृत.

संस्कृत ही अशी भाषा आहे जी पुर्णपणे वैज्ञानिक भाषा आहे. जिला देववाणी किंवा सुरभारती असेही म्हटले जाते. सांगायचं मुद्दा हा की असे असूनही जिथे या भाषेचा उगम झाला त्या भारत भूमीत तिचा म्हणावा तसा वापर होताना दिसत नाही. इतर स्थानिक आणि परकीय भाषांच्या अतिक्रमणामुळे संस्कृत ही सर्वात कमी वापरली जाणारी भाषा बनली आहे.

हे शल्य जाणवल्यामुळे काशी या विश्वनाथाच्या नगरीतील एका व्यक्तीने वयाच्या दहाव्या वर्षी आयुष्यभर संस्कृतमध्येच बोलण्याचा पण केला आणि आजतागायत तो पाळला देखील! त्यात ही ती व्यक्ति वकील असून आपले सर्व न्यायालयीन कामकाज ती संस्कृतमधून करते. कोण आहे बरं ती व्यक्ती? तुम्हाला ही प्रश्न पडला असेलच ना? चला तर मग जाणून घेवू या संस्कृत मित्राबद्दल.

सामन्यात: न्यायालयातील कामकाज हे एकतर त्या ठिकाणच्या स्थानिक भाषेत अथवा इंग्रजीत केले जात असताना काशी/वाराणशी मधील एका वकिलाने मात्र आपल्या कामकाजाची भाषा म्हणू चक्क संस्कृतची निवड केली आहे. होय…अगदी बरोबर आचार्य श्याम उपाध्याय हे जगातील एकमेव वकील आहेत जे आपले न्यायालयीन कामकाज शुद्ध संस्कृतमधून करतात. इतकेच नाही तर ते आपल्या आशिलांशी देखील त्यांना सहज समजेल अशा मार्गाने संस्कृतमधून संवाद साधतात. आपले सर्व खटले संस्कृतमध्ये लढतात.

न्यायालयात वकीलपत्र सादर करण्याचा विषय असो किंवा प्रतिज्ञापत्र, अर्ज सादर करणे असो, आचार्य श्याम उपाध्याय हे सर्व काम संस्कृत भाषेतच करतात. आचार्य श्याम उपाध्याय सांगतात की, सुरुवातीच्या काळात जेव्हा ते आपल्या आशिलाची कागदपत्रे संस्कृतमध्ये लिहायचे आणि न्यायाधीशांसमोर ठेवायचे, तेव्हा न्यायाधीशही आश्चर्यचकित व्हायचे.

आजही वाराणसीच्या न्यायालयात कोणतेही नवे न्यायाधीश आले की त्यांनाही आश्चर्य वाटते. अशा स्थितीत अनुवादकाच्या मदतीने न्यायाधीश माझा न्यायालयात केलेला युक्तिवाद ऐकून घेतात. संस्कृत भाषेसोबतचा हा सिलसिला १९७८ मध्ये सुरू झाला जेव्हा त्यांनी हरिश्चंद्र महाविद्यालयातून बीए. एलएलबी ह पदवी संपादन करून न्यायालयात कामकाज सुरू केले.

आचार्य श्याम उपाध्याय सांगतात की, ‘लहानपणी मी माझ्या वडिलांकडून ऐकले होते की, न्यायालयातील सर्व कामकाज हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेत चालते, संस्कृतचा वापर केला जात नाही. तेव्हाच मी माझ्या मनात ही गोष्ट बिंबवली होती की मी वकील होईन आणि न्यायालयाची -सगळी कामे याच भाषेत करेन.

१९७८ पासून मी कोर्टात हजारो खटले संस्कृत भाषेत लढले आणि मला यश मिळाले. बालपणीचे दिवस आठवताना आचार्य श्याम उपाध्याय यांनी सांगितले की, एकदा ते त्यांच्या वडिलांसोबत कुठेतरी जात होते. त्यावेळी ते साधारण १०वर्षांचे असावेत आणि चौथीत शिकत असावेत. वाटेत वडिलांना काही लोक भेटले आणि ते सर्वजण भोजपुरीमध्ये संवाद साधू लागले.

दरम्यान, त्याच्या वडिलांनी लोकांना सांगितले की, आपण ज्या प्रकारे भोजपुरीमध्ये बोलतो, त्याच पद्धतीने आपण संस्कृतमध्ये बोलू शकत नाही का? ही गोष्ट त्या लोकांना समजली की नाही कल्पना नाही , पण आचार्य श्याम उपाध्याय यांनी ही गोष्ट त्यांच्या मनात रुजवली. आणि संस्कृतचा ध्यास तेव्हापासूनच घेतला गेला. त्यानंतर त्यांनी संस्कृतचे शिक्षण घेण्याचे ठरवले. त्यांनी संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठातून बौद्ध तत्त्वज्ञानाचे आचार्य संपादन केले.

आपल्या गुरूंच्या सांगण्यावरून त्यांनी प्रथम अध्यापनाचे काम केले. मात्र, त्यांना संस्कृतच्या प्रचार आणि प्रसारासाठी काहीतरी वेगळे करायचे होते म्हणून वकिलीची परीक्षा उत्तीर्ण होवून त्यांनी १९७८ पासून त्यांनी संस्कृत भाषेतून खटला लढण्यास सुरुवात केली जी आजतागायत सुरू आहे.

कपाळावर लावलेला त्रिपुंड आणि तिलक तसेच पारंपारिक काळ्या कोटातिल त्यांना सहज ओळखता येते. असे म्हणतात की “ज्या क्षणी ते अस्खलित संस्कृतमध्ये युक्तिवाद करू लागतात , तेव्हा ऐकणारे सर्व लोक मंत्रमुग्ध होतात.”

*संस्कृत भाषेसाठीच्या त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने २००३ मध्ये ‘संस्कृत मित्रम’ पुरस्काराने सन्मानित केले होते. १९७८ पासून ते संस्कृतच्या संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. संस्कृत भाषा पुन्हा लोकांमध्ये रुजवण्याची त्यांची मोहीम आजही सुरू आहे. यासाठी आचार्य श्याम उपाध्याय ४२ वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. याचा परिणाम म्हणून ते न्यायालयापासून शयनकक्षापर्यन्त फक्त आणि फक्त संस्कृत भाषा वापरतात. गौरवाची गोष्ट म्हणजे संस्कृत भाषेमध्ये त्यांनी ६० हून अधिक कादंबर्‍यांचे लेखन केले आहे.*

*आचार्य श्याम उपाध्याय या अवलियाची ही संस्कृत प्रेमाची कहाणी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा आणि अतुल्य भारतातील या व अशा अनेक अभिमानस्पद यशोगाथा वाचण्यासाठी आपल्या “महाराष्ट्राचा चांगुलपणा” सोबत जोडलेले रहा.*

महाराष्ट्राचा चांगुलपणा ग्रुप साठी…
सुरेखा नेसरीकर.
कोल्हापूर. 9028261973.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *