सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम

⭕राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 

कार्यक्रमास गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खा. गिरीश बापट, महापौर मुरलीधर  मोहोळजी,  विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरु डॉ. एन.एस उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, पुतळा समितीचे अध्यक्ष डॉ. संजय चाकणे, समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित. हा पुतळा संजय परदेशी यांनी बनवला आहे.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,

·        अभिमान वाटावा असा हा  आजचा सोहळा

·        २०१४ ला पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले. आज आपण त्यांचा पुर्णाकृती पुतळा बसवत आहोत.

·        सावित्रीबाई स्वत: एक विद्यापीठ होत्या.

·        त्यांचे एकूण चरित्र वाचले तर त्यांचे काम लक्षात येते

·        फुले दाम्पत्याने स्वत:च्या सुखी संसारापलिकडे जाऊन समाज सुखाचे स्वप्नं पाहिले, त्यासाठी संघर्ष केला.

·        समोर सगळा अंधार असतांना या दाम्पत्याने सदैव समाज बांधवासाठी, देशातील नागरिकांसाठी कामं केली. लोकांच्या आयुष्यात फुले कशी फुलतील हे पाहिले.

·        सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आपल्या सर्वांचे कर्तव्य.

·        आजचे युग जाहिरातीचे युग, पण त्या काळात जोतिबांना किंवा सावित्रीबाईंना काय व्हायचे होते? तरीही त्यांनी अनेक सामाजिक कामाला ना केवळ सुरुवात केली परंतू त्याला योग्य दिशाही दिली.

·        माझा देश शिक्षित, समाज निरोगी असला पाहिजे यासाठी आयुष्य समर्पित केले

·        पुरातनाला प्रबोधनातून आधुनिकीकरणाकडे नेले, त्यासाठी आयुष्य जगले

·        बुरसटलेल्या विचारात अडकलेल्या देशाला स्वातंत्र्य मिळून काही अर्थ मिळणार नाही म्हणून असे विचार दूर करायला त्यांनी प्राधान्य दिले.

·        ज्योतीसारखं त्या आयुष्य जगल्या. स्वत: जळत इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण केला.

·        ज्यांचे पुतळे आपण उभे करतो पण त्यांच्या आयुष्यातून आपण काहीच शिकलो नाहीत तर मग कशालाच अर्थ नाही.

·        सावित्रीबाई फुले यांच्या कवितांमध्ये स्वप्न रंजन नाही, आयुष्याला दिशा देणाऱ्या या कविता आहेत.

·        बहिणीबाईंनी माणसा माणसा कधी होशील माणुस असे म्हणत मनातील द्वेष दूर करण्याचा प्रयत्न केला

·        या साधुसंत, विचारवंताच्या विचारांनी देशाला पुढे नेऊ या,

·        प्रत्येकाला आपल्या मर्यादेचे भान आले तरी आपण बरेच काही साध्य करू शकू.

·        सावित्रीबाई फुले यांचं नाव ज्या विद्यापीठाला मिळालं त्या विद्यापीठावर मोठी नैतिक जबाबदारी.

·        महिला ‍शिकली पाहिजे, समाज निरोगी राहिला पाहिजे यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं

·  प्लेगची लागण झालेल्या पांडुरंग नावाच्या मुलाला वाचवताना त्यांना ही प्लेगची लागण झाली आणि त्यात त्या गेल्या. त्यांनी आपल्या आयुष्याचा विचार केला नाही. अशा सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या कार्याचा वारसा जपण्याचे, विद्यापीठावर नैतिकतेचे ओझे

·        सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणून विद्यापीठाचा विद्यार्थी कुठेही गेला तरी त्याचा सन्मान व्हावा, विद्यापीठाची प्रतिष्ठा वाढेल असे विद्यार्थी या विद्यापीठात घडावेत, तसा अभ्यासक्रम निश्चित व्हावा अशी अपेक्षा. हे विद्यार्थी कुठल्याही स्पर्धात्मक वातावरणात सन्मानाने पुढे गेले पाहिजेत एवढी क्षमता त्यांच्यात निर्माण व्हावी

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *