आमदार सुभाष धोटे यांच्या पाठपुराव्याला यश : जिल्ह्यातील २६५ लाभार्थ्यांना मिळणार लाभ.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕राजीव गांधी निवारा योजनेच्या कर्जावरील व्याजाच्या प्रतिपुर्तीला मंजूरी.

राजुरा (ता.प्र) :– सुधारित राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र. 2 अंतर्गत मंजूर गृहकर्जावरील व्याजाची प्रतिपुर्ती आमदार सुभाष धोटे यांच्या पाठपुरामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना कर्जावरील व्याजाची प्रतिपुर्ती मंजूर झालेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध बँक शाखेतील राजीव गांधी ग्रामीण निवास योजना क्र 2 अंतर्गत कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आले असून गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) नागपूर यांच्या कार्यालयाकडून 1751 कर्जप्रकरणे मंजूर झाले होती. जिल्ह्यातील बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक मर्या चंद्रपूर इत्यादी शाखा मधील 265 लाभार्थी यांचे कर्ज प्रकरणे व्याजाचा प्रतिपूर्ती साठी मुख्य अधिकारी, नागपूर गृह निर्माण क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) यांच्याकडे प्रकरणी पाठविण्यात आले. परंतु सदर घरकुल लाभार्थ्यांना व्याजाची प्रतिपूर्ती मंजूर न झाल्यामुळे व्याजाच्या रक्कमेमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली. लाभार्थ्यांचे इतर योजनेमधून किंवा शेतमालाची जमा झालेली रक्कम बँक लाभार्थ्यांच्या खात्यामधून परस्पर व्याजाची रक्कम कपात करीत होते. ही बाब लाभार्थ्यांनी आमदार सुभाष धोटे यांच्या लक्षात आणून दिली.
आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (दिशा) बैठकीत वारंवार प्रश्न उपस्थित करून परिस्थितीची जाणीव करून दिली परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ही समस्या तसीच प्रलंबित राहिली होती. याबाबत आमदारांनी गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पत्रव्यवहार करून सदर बाब शासनाच्या लक्षात आणून दिली त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजीव गांधी ग्रामीण विकास योजना क्र. 2 अंतर्गत मंजूर गृह कर्जावरील व्याजाची प्रतिपूर्ती मिळण्यासंदर्भातच्या प्रलंबित प्रस्तावाचे मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी आदेश दिल्यामुळे गृहकर्जावरील व्याज प्रतिपुर्ती मंजुर करून निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून दिली आहे. यामुळे जिल्ह्य़ातील घरकुल लाभार्थी मध्ये आनंदांचे वातावरण निर्माण झाले असून लाभार्थी बांधवांनी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांचे प्रती आभार व्यक्त केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *