लोकदर्शन 👉 अनिल देशपांडे
जागतिक रेडिओ दिन दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ‘युनेस्को’ने २०११ मध्ये जागतिक रेडिओ दिनाची घोषणा केली आणि इटलीत झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमाद्वारे २०१२ पासून जागतिक रेडिओ दिनाची सुरुवात झाली. रेडिओबाबतच्या ‘पुढील’ गोष्टी माहिती आहेत का?
जागतिक रेडिओ दिन दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. रेडिओबाबतच्या ‘पुढील’ गोष्टी माहिती आहेत का?
कशी झाली सुरुवात?
‘युनेस्को’ने २०११ मध्ये जागतिक रेडिओ दिनाची घोषणा केली आणि इटलीत झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमाद्वारे २०१२ पासून जागतिक रेडिओ दिनाची सुरुवात झाली.
भारतात कधी सुरू झाला रेडिओ?
भारतात १९२७ मध्ये रेडिओचे प्रसारण सुरू झाले. भारतात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ व टपाल खात्याच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट १९२१ मध्ये ‘टाइम्स’च्या मुंबईतील इमारतीतून गाण्याचा एक विशेष कार्यक्रम प्रसारित झाल्याची नोंद आहे.
निवेदक नव्हे आरजे
रेडिओची भाषा बदलली. निवेदकांची जागा ‘आरजे’ने घेतली. शांत, संयमी भाषेला सुपरफास्ट, इंग्रजीची जोड असलेली भाषा आता रेडिओवर ऐकू येते.
ट्रॅफिक आणि रेडिओ
महानगरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. पण प्रवासाचा वेळ जेवढा वाढत आहे, तेवढं रेडिओ ऐकण्याचं प्रमाणही वाढत आहे. म्हणूनच नवनवे रेडिओ चॅनेल्स येतच आहेत.
गेल्या ९३ वर्षांत माध्यमांमध्ये अनेक स्थित्यंतरे आली, पण रेडिओचं महत्त्व कमी झालेलं नाही. कोणत्य़ाही ठिकाणी अगदी सहजपणे ऐकता येणारे माध्यम म्हणून आजही रेडिओकडे पाहिले जाते. अर्थात काळानुसार त्यात बदल झाले.
रेडिओची भाषा बदलली. निवेदकांची जागा ‘आरजे’ने घेतली. शांत, संयमी भाषेला सुपरफास्ट, इंग्रजीची जोड असलेली भाषा आता रेडिओवर ऐकू येते.
कम्युनिटी रेडिओ
मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजासाठी सरकारने कम्युनिटी रेडिओची संकल्पना सुरू केली आहे. काही विद्यापीठांचेदेखील स्वत:चे कम्युनिटी रेडिओ आहेत. सध्यस्थितीत भारतात सुमारे २५१ कम्युनिटी रेडिओ आहेत. त्यापैकी भारतात २२ आहेत.
संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
साभार
नेट