लोकदर्शन 👉 मोहन भारती
आज मानव देव देवळात आणी दगडात शोधताना दिसतो आहे.हा विज्ञान युगाचा चमत्कार कि अज्ञाण युगाचा कळस हा मार्मिक प्रश्न आधुनिक भारतापुढे निर्मागण झाला आहे.ऋषी मुनी व संत शिकवणुकित देव माणसाचा अंतह्यदयात विराजमान आहे असे सांगून सुद्धा मानव बाह्यस्रुष्टित देव शोधत फिरत आहे हे नवलच आहे.किंबहुना माणसाचा प्रथम देव सुर्यदेव, द्वितीय देव वृक्ष,आणी त्रुतीय देव सरिता(जल) आहे.आज मानवी जीवनातील ब्रह्मा, विष्णू आणी महेश हेच असावेत याची मानवाने पक्की खुणगाठ मनाशी बाळगावी हिच अपेक्षा आहे.
आपल्या पुर्वजानी नैसर्गिक महत्वाची जी तत्वे आहेत ती देव देवता यांचे नावाने प्रतीकस्वरुपात जतन करण्याचे ज्ञान आपणास दिलेले असताना त्यातील मुलमंत्र सोडून मानवाने विनाशगतीच्या मार्गावर चालणे पसंत केले आहे असेच म्हणावे लागेल.काळ हा बदलत असतो.काळ हा असला इलमी जादूगार आहे की जो आपल्या धांवत्या गतीबरोबर त्या हेतूचे रंग आरपार बदलून, त्या वस्तूला स्थितीला आणि कल्पनेला सुद्धां उलटी पालटी करून टाकतो. पूर्वी स्तुत्य वाटणारी गोष्ट आज सर्वथैव निंद्य कशी ठरते, याचेंच पुष्कळांना मोठें कोडें उलगडत नसते.पण तें उलगडणें फारसें कठीण नाही. काळ हा अखंड प्रगमनशील आहे. निसर्गाकडे पाहिलें तरी तोच प्रकार. कालचें रोपटे सदा सर्वकाळ रोपटेच रहात नाही. निसर्ग धर्मानुसार कालगतीबरोबरच तेही अंतर्बाह्य एकसारखें वाढतच जातें आणि बघता बघता अल्पशा कालावधी त त्याचे एका वटवृक्षात स्थित्यंतर व रूपांतर झालेलें आपणांस दिसतें. काळाच्या प्रगतीच्या तीव्र वेगामुळें झपाझप मागें पडणारी प्रत्येक वस्तुस्थिती आणि कल्पना, ती जर दगड धोंड्याप्रमाणें अचेतन अवस्थेंत असेल तर, प्रगमनशील डोळ्यांना ती विचित्र आणि निरुपयोगी दिसल्यास त्यांत काहींच चुकीचे नाही. जेथें खुद्द निसर्गच हरघडी नवनव्या थारेपालटाचा कट्टा अभिमानी, तेथें मनुष्याचा जीर्णाभिमान फोलच ठरायचा. मानव अन्नावाचून २१ दिवस जगून शकतो, पाण्यावाचून सात दिवस तग धरू शकतो पण श्वासावाचून पाच मिनिटे जगू शकत नाही.कोरोना काळात प्राणवायू सिलिंडर किती रुपयांत उपलब्ध होतो याचा अनुभव नागरिकानी घेतलाच आहे.अशा प्राणवायू देणार्या झाडांचे आर्थिक व जैविक महत्व अधोरेखित करण्यासाठी हा लेख प्रपंच आहे.सदर प्रास्ताविक करण्यामागे मुख्य कारण म्हणजे आज होत असलेली पर्यावरणाची हेळसांड.
धरणीमातेने मुक्त हस्ते बहाल केलेला खजिना म्हणजे झाडे त्यामुळे त्यांना हिरवे सोने म्हणतात.
संस्कृत मध्ये तर परोपकाराय फलन्ती व्रुक्ष या शब्दात झाडांचा गौरव केलेला आहे.संत तुकाराम महाराज यांनी तर “व्रुक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे,
पक्षीही सुस्वरे आळवती”या शब्दात वनांचा व व्रुक्षांचा संबंध जोडला आहे व मानवी हस्तक्षेपामुळे होणारा धोकाही व्रुद्धींगत केला आहे.वनांच्या जडण−घडणीच्या स्वरूपावर मानवी हस्तक्षेपाचा प्रथमपासूनच सतत परिणाम घडत गेलेला आहे. आदी मानवाच्या शिकारी जीवन पद्धतीत सर्वप्रथम वनांचा उपयोग पशू व पक्षी यांच्या शिकारीखेरीज, लाकडापासून अग्नी व ऊब, झाडांच्या सालीपासून वल्कले, कंदमुळे, शिकारीसाठी ओबडधोबड शस्त्रे निर्माण करणे अशा स्वरूपाचा झालेला आहे. त्यानंतरच्या शेतीप्रधान जीवन पद्धतीत वनक्षेत्र साफ करून धान्यांची लागवड करणे व शेतीच्या अवजारांसाठी लाकडे तोडणे असा वाढत्या प्रमाणात वनांचा वापर मनुष्य करू लागला. पुढे हळूहळू जसजसे वनांचे इतर अनेकविध उपयोग मानवाच्या लक्षात येऊ लागले, तसतसे वनांवरील मानवी हस्तक्षेपाचे प्रमाण जास्त व्यापक व प्रकर्षी बनत गेले. फळे, सुगंधी व औषधी वनस्पती जमविणे, घरे, गुरांचे गोठे, होड्या, अवजारे, इंधन वगैरेंसाठी, तसेच शेतीचा विस्तार वाढविण्यासाठी निरनिराळ्या झाडंची लाकडे तोडणे अशा तऱ्हेचे हे हस्तक्षेप होते. सुरुवातीला मानवी वस्ती कमी व वने विस्तृत अशा परिस्थितीमुळे या हस्तक्षेपाचे वनांवर विशेष प्रतिकूल परिणाम होत नसत. त्यामुळे सहसा त्या काळी वनांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण होत नसावा.वनांचे, वृक्ष, वेली, पशु पक्षी सगे सोयरे का तर वरील प्रकारे विविध उपयोग मनुष्याने वनांकडूनच करून घेतला.पण आज त्यांची उतराई करण्यासाठी मानवाने पुढे सरसावले पाहिजे.धरणीमाता आज संकटात आहे त्याचे आगाऊ संकेत म्हणजे च वातावरणातील बदल आहेत हे मानवाने लक्षात घेणे आवश्यक आहे.
वसुंधरेवरील म्हणजेच पृथ्वीवरील वने, माती, हवा, पाणी व जैवविविधता यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणे, तसेच पुढील पिढय़ांसाठी त्यांचे संवर्धन करणे, मानवनिर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण व पर्यावरणाची नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालणे. याविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे. त्यासाठी झाडांचे मुल्य किती आहे हा पण आर्थिक निष्कर्ष पुढे दिलेला आहे त्यापासून हि मानवाने बोध घ्यावा.
जागतिक लोकसंख्या १.६ अब्जांनी वाढली आहे. या प्रचंड लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी पृथ्वी जेवढे देऊ शकते किंवा राखू शकते, त्याहूनही अधिक प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर आपण करीत आहोत. त्यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन ४८ टक्क्यांनी वाढले आहे. मानवी कृतीतून उत्सर्जित होणा-या हरितगृह वायूंपैकी ‘कार्बन डायऑक्साइड’ हा सर्वाधिक घातक असा वायू आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार, गेल्या १० वर्षात पृथ्वीच्या तापमानात जेवढी वाढ झाली आहे, त्यापैकी ८५ टक्के तापमानवाढ एकटय़ा कार्बन डाय-ऑक्साइडमुळे झाली आहे. खनिज इंधने ही मानवनिर्मित कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनाचे मोठे स्रेत आहेत. आपण ज्या ज्या वेळी वाहनांचा व ऊर्जेचा अतिरेकी वापर करत असतो. त्या त्या वेळी खनिज इंधने जाळून कार्बनडायऑक्साइडची निर्मिती करत आपण जागतिक तापमानवाढीला हातभार लावत असतो.आपल्या इतर छोटय़ा-मोठय़ा कृतीतूनही पर्यावरणास घातक ठरणा-या वायूंची निर्मिती होत असते. जसे की, आपल्याला नको असलेले अन्न जेव्हा आपण फेकून देतो, तेव्हा जमिनीत फेकल्या गेलेल्या अन्नामुळेही जागतिक तापमानवाढीला कारणीभूत ठरणा-या वायूची निर्मिती होत असते. सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे आजमितीस उत्पादित अन्नाच्या साधारणपणे एक तृतीयांश अन्न फेकून दिले जाते. या कृतीतून आपण कोणाच्या तरी हक्काच्या अन्नाची नासाडी करतोच. शिवाय अन्नधान्य उत्पादनासाठी वापरली गेलेली जमीन, पाणी, ऊर्जा या संसाधनांचीही एका अर्थाने नासाडीच करत असतो आणि अंतिमत: तापमानवाढीला चालना देत असतो. जागतिक तापमानवाढीचे परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत. हिमपर्वत व हिमनद्या वितळू लागल्या आहेत आणि त्यांच्या पाण्यामुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक पर्यावरण तज्ज्ञांनी छोटी बेटे आणि समुद्रसपाटीजवळ असलेल्या जगभरातील सर्वच शहरांना धोक्याचा इशारा दिला आहे.
यावर रामबाण उपाय म्हणजे व्रुक्ष संवर्धन हाच आहे कारण झाडे जगण्यासाठी ऑक्सीजन देतात,
पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करतात, ध्वनी, वायू, जल प्रदुषण रोखतात, कार्बन डाय ऑक्साइड वायू शोषुण घेण्याचे महत्त्वाचे कार्य वनस्पती करतात. जमिनीची धूप रोखतात,पुराचा धोका कमी करण्यास मदत होते, जडीबुटी पासून औषध निर्मिती करता येते,निरोगी आरोग्य जगण्यासाठी शुद्ध हवा पुरवठा वनस्पती करत असतात, जैविक विविधता जोपासली जाते व जीवन आनंदमय बनवण्यास मदत करतात,
निसर्ग सौंदर्य फुलवण्यासाठी मदत करतात, वृक्ष
साधन संपत्ती जसे फूल,मध, डिंक इ. देतात, पाऊस पाडण्यासाठी झाडं महत्वाची भूमिका बजावतात,तापमान वाढ रोखण्यात झाडांचा सिंहांचा वाटा असतो शिवाय पालापाचोळा पासून ख़त निर्मिती होऊन पुन्हा झाडांना संजीवनी मिळते व हे चक्र अव्याहत पुणे चालू राहते.मात्र मानवी हस्तक्षेपामुळे हे चक्र बाधित होत आहे हे वेळीच ध्यानात घेणे काळाची गरज आहे.
भविष्यात वृक्ष टिकले नाहीत तर आपणही टिकणार नाही.वृक्ष मांणसाचे जीवन फुलांनी सुशोभित व सुगंधित करतात आणी फळांनी रसभरीत करतात.आपण मात्र व्रृक्षावर कुर्हाड चालवून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतो.
मानवी जीवन आनंदमय, चैतन्य मय होण्यासाठी झाडे वाचवा व एक तरी झाड लावा व जगवा.
असे झाले तर सृष्टी आपल्या वर मायेचे छत्र सदैव ठेवील व तिची असिम कृपादृष्टी राहिलं.
आता आपण वनस्पती चे आर्थिक महत्व पटवून घेऊ म्हणजे झाडांचे आपल्या वर किती ऋण आहे हे लक्षात येईल.
एक प्रौढ झाड दररोज सरासरी दोनशे तीस लिटर ऑक्सिजन उत्सर्जित करते. त्याच बरोबर ते वातावरणातील जवळपास बावीस किलो कार्बन डाय-ऑक्साइड वायू शोषून घेते.
एका व्यक्तीला दररोज पाचशे पन्नास लिटर (५५० लीटर ) ऑक्सिजनची गरज असते.हि गरज मानव श्वासोच्छ्वासाच्या माध्यमातून पुर्ण करत असतो. एखाद्या व्यक्तीने श्वासोच्छवासाचेद्वारे फुप्फुसांमध्ये घेतलेल्या हवेमध्ये २० टक्के ऑक्सीजन असतो. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी किमान तीन प्रौढ वनस्पतींची आवश्यकता असते.
१ मानव. =. तीन झाडे
आज-काल मोठमोठ्या कंपन्या ऑक्सिजनचा व्यापार करू लागले आहेत. आठ हजार पाचशे रुपयात ७५० लिटर ऑक्सीजन सिलेंडर देतात. यावरून एखाद्या व्यक्तीचा विचार केल्यास एक व्यक्तीला वर्षांमध्ये २३ लाखाचा ऑक्सीजन खरेदी करावा लागेल.
१ व्यक्ती वर्षाला = २३ लाखाचा आॅक्सीजन वापरते.आज सरासरी माणसाचे आयुष्य ६० वर्षे धरले तरी जवळपास १४ कोटी रुपयांचा प्राणवायू आवश्यक असतो. (१३.८०लाख) यावरून हेच सिद्ध होते की आरोग्याचे गमक प्राणवायू दडलेले आहे.म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला दर वर्षी झाडे २३ लाखाचा प्राणवायू मोफत देत असतात.आणी मोबदल्यात मानव झाडांसाठी काय करतो हे वैचारिक समजल्या जाणाऱ्या मानवाला अधिक सांगणे न लगे.
आपण एक झाड पन्नास वर्षे जगते असे गृहीत धरले तर त्या पन्नास वर्षात एक झाड ६ लाखाचा प्राणवायू निर्माण करते,७ लाख रुपयाची मातीची सुपीकता वाढते,११ लाख रुपये हवेचे प्रदूषण रोखते.
पाणी हे जीवन आहे असे का म्हणतात तर दर दिवशी दर माणसी सरासरी २०० लीटर पाणी वापरतो असे समजले तरी वर्षाकाठी सरासरी ७५००० लीटर वापरले जाते.सरासरी माणसाचे वय ६० वर्षे धरले तर एक मानव आपल्या आयुष्यात ४५००००० लीटर पाणी वापरतो.आजचा एक लीटर पाण्याचा बाजारभाव रुपये २०/-प्रती लीटर धरला तर पाण्याची किंमत रुपये ९०००००००/- कोटी होतात.यावरुन हेच स्पष्ट होते कि १४ कोटींचा प्राणवायू आमी ९ कोटींचे जल मानव आयुष्यात विनामोबदला स्विकारतो त्याबदल्यात तो निसर्ग ला काय देतो तर् घाव देतो.हा क्रुतघ्नपणाचा कळस नाही का??ळ
वृक्षवल्ली आम्हा सोयरी” म्हणजे झाड आपली मित्र. हो खरच, वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. मानवाची सेवा करण्यात निसर्गाचा फार मोठा सहभाग आहे. वृक्ष केवळ आपलेच जीवन प्रभावित करतात असे नव्हे, ते तर आपले अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी संजीवनी प्रदान करतात. प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन गरजांची पूर्ती करणारा वृक्ष आजही मानवी जीवन आणि समाजाच्या अस्तित्वच्या संधर्भात महत्वाची भूमिका बजावीत आहे. मानवाला त्याच्या दैनंदिन जीवनात गरजेच्या सर्व गोष्टी अगदी निरपेक्ष हेतूने वृक्ष देतात. वृक्षांपासून आपणास अन्नधान्यापासून ते घरसजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू सर्व काही मिळते. सर्व सजीवांना जीवंत राहण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजें ऑक्सीजन. ऑक्सीजन श्वास घेऊन आपण कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतो. हाच कार्बन डायऑक्साइड वृक्ष शोषून घेतात व आपणाला आवश्यक असणारा ऑक्सिजन ते सोडतात. तसेच वृक्षांपासून आपणास अन्नधान्य, भाजीपाला, फळे, औषधी, इंधन, इमारती लाकूड आदी प्राप्त होते. भूमी आणि जलसंरक्षणाचे काम वृक्ष करतात. पाण्याचा दुष्काळ, पूर नियंत्रण, जमिनींची धूप या गोष्टी रोखण्यासाठी वृक्षच मदत करतात. जमिनींचा ओलसरपणा टिकून राहण्यासाठी वृक्षांचा उपयोग होतो. हिमालयाच्या पर्वतीय भागात देवदार, बांबू, साल, साग इत्यादी वृक्ष आढळतात. अशा वृक्षांपासून आपल्याला इमारती, जहाजे इ. साठी लाकूड मिळते तसेच निसर्गाचा समतोलही राखला जातो.
उत्क्रांतीच्या प्रवाहात वहाणीस लागलेल्या मानवांनी काळाच्या आणि निसर्गाच्या बदलत्या थाटाबरोबर आपल्या आचार विचारांचा थाट जर शिस्तवार बदलला नाहीं, तर कालगतीच्या चक्रांत त्यांच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्याशिवाय राहावयाच्या नाहीत.त्यासाठी पर्यावरण किंबहुना झाडांचे संवर्धन व जतन करणे फारच महत्त्वाचे आहे.
डॉ.पी.व्ही.पाटील,
अनंतराव थोपटे महाविद्यालय,भोर.
parshuramvpatil@gmail.com
Contact 9325884108.