लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्रातील कोळसा खाणीमध्ये कोळसा व माती खनन करणाऱ्या कंत्राटी कंपन्यांमध्ये ८० टक्के स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करणे अनिवार्य असतांना या कंपन्या परप्रांतियांना झुकते माप देऊन रोजगार देत असल्याने स्थानिक युवकांवर अन्याय होत आहे त्यामुळे संबंधित कंपन्यांना शासन धोरणानुसार स्थानिक युवकांना रोजगार देण्याचे निर्देश द्यावेत अशी सूचना *पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ* यांना केली तसेच बी एस इस्पात व टॉपवर्थ ऊर्जा अँड मेटल कंपन्या द्वारे अटी, शर्थीचे उल्लंघन करून कोळशाची परस्पर बाजारात अवैध विक्री करून दिशाभूल चालविली आहे या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करून ब्लॉक रद्द करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी केली.