लोकदर्शन 👉 राहुल खरात
आज जिल्हा परिषद शाळा नंबर 2 पलूस येथे शनिवार चा दिवस दप्तराविना शाळा उपक्रमांतर्गत भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर व या स्वातंत्र्यवीर कॅप्टन रामभाऊ लाड यांना अभिवादन करण्यात येऊन त्यांच्या जीवन कार्याविषयी चा आढावा घेणाऱ्या वर्तमानपत्रातील बातम्या विद्यार्थ्यांना वाचनास उपलब्ध करून देण्यात आल्या. क्रांतीवीर रामभाऊ लाड व लता मंगेशकर यांच्या निधना दिवशीची सर्व वर्तमान पत्रे विद्यार्थ्यांना वाचण्यास उपलब्ध करून देण्यात आली.यामध्ये दै.पुढारी,दै.सकाळ,दै.तरुणभारत,दै.केसरी,दै.जनप्रवास,दै.लोकसत्ता,दै.पुण्यनगरी ,दै.लोकमत अशा वर्तमानपत्रांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी आवडीने लता मंगेशकर व क्रांतीवीर रामभाऊ लाड यांचे जीवन कार्य वाचले.प्रारंभी या दोन महान व्यक्तीविषयी माहिती शाळेतील उपक्रमशील शिक्षक मारुती शिरतोडे सर यांनी दिली. यावेळी शाळेच्या वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ उज्वला पाटील, शाळेतील शिक्षक संभाजी पाटील, जगन्नाथ शिंदे ,सौ सोनाली चव्हाण, सौ सुनीता पवार, श्रीमती शैलजा लाड उपस्थित होते. या वाचनानंतर मुलांना काही प्रश्न विचारणेत आले.या उपक्रमाने मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेले दिसले.