लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*⭕पं. दीनदयाल उपाध्याय यांचा अंत्योदयचा विचार सदैव अंगिकारून कार्य करणार – विवेक बोढे*
शुक्रवार 11 फेब्रुवारी रोजी येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात *भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात* एकात्म मानवदर्शनाचे प्रणेते, भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
मनोगत व्यक्त करतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले पं. दीनदयाल उपाध्याय अंत्योदयाचा विचार भारत वासीयांपर्यंत पोहचवीणारे, भाजपाचे प्रेरक व जनसंघाची स्थापना करणारे होते. त्यांचा अंत्योदयचा विचार घेऊन आम्ही कार्य करणार आहोत. मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सेवाग्राम येथे बुधवारला पाठविण्यात येत आहे.
त्यांच्या स्मृतिदिनी गोर गरीब रुग्णांची सेवा करून पंडितजींना आम्ही अभिवादन करतो.
उपस्थित कार्यकर्त्यांना भाजपातर्फे राबवण्यात येणाऱ्या मायक्रो डोनेशन या उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. अनेक कार्यकर्त्यांनी मायक्रो डोनेशन केले.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे विनोद चौधरी, रत्नेश सिंग, सुरेंद्र जोगी, अनंता बहादे, मल्लेश बल्ला, मानस सिंग, गुरूदास तग्रपवार, राजा रेड्डी, अतिश मेळावार, येरला भीमय्या, गणराज सोनेकर, नामदेव धांडे, अमृत बरडे, पांडुरंग मडकवार, मुत्तबाला नलभोगा, सोनू रॉय उपस्थित होते.