लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– शेतकरी कल्याण निधी अंतर्गत आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या पुढाकाराने क्षेत्रातील कॅन्सरग्रस्त रुग्णास उपचाराकरिता जिल्हा मध्यवर्ती बँके तर्फे प्रत्येकी ३००००/- (तीस हजार रुपये) आर्थिक मदत करण्यात आली.
या अंतर्गत रमेश गोसाई दरेकर मु. भेंडाळा पो. विरूर स्टेशन यांच्या पत्नी सविता देरकर यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी उपनगरध्यक्ष सुनील देशपांडे, राजुरा शाखेचे व्यवस्थापक सुधीर वानखेडे सय्यद जी, गजेंद्र ढवस आदिंची उपस्थिती होती.