लोकदर्शन 👉 मोहन भारती
सोलापूर दि.10/2/2022
महाराष्ट्र प्रशासन विभागाने पामवाईनच्या नावाखाली ताडी (शिंदी दुकाने) परवाना दिले परंतु या ताडी दुकान वाल्यांनी दाट लोकावस्तीच्या ठिकाणी परिसरातील लोकांचा विरोध असताना व पालकमंत्री श्री दत्ता मामा भरणे ताडी दुकाने उघडू नये असे आदेश दिले. तरीही केवळ आर्थिक लाभासाठी ताडी दुकाने लुटण्यासाठी उघडण्यात आलेल्या ताडी (शिंदी) दुकानामुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून पोलिस आयुक्त् यांनी याबाबत सखोल चौकशी करुन कारवाई करावी. अशा मागणीचे निवेदन ताडी (शिंदी) दुकाने विरोधी संघर्ष समितीच्या वतीने संघर्ष समितीचे निमंत्रक विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली मा.पोलिस आयुक्त साहेबांना दिण्यात आले आहे.
मा. पोलिस आयुक्त यांना देण्यात आला मा. पोलिस आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात. महाराष्ट्र्र शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्र्र सह अनेक जिल्यात मोठयाप्रमाणात ताडी शिंदी दुकानउघडण्यात आल्या आहेत. परंतु हे दुकाने उघडण्यास ताडी दुकानांच्या आजू-बाजूचे लोक व महिलावर्गाकडून ताडी दुकानांना विरोध होतांना दिसुन येते तसे लेखी निवेदन परिसरांतील नागरिकांनी
ताडी दुकानांना लोकांचा विरोध् त्याच बरोबर विविध संघटना, मा.महापौर,सौ.यन्न्म ताई आमदार व माजी पालकमंत्री श्री.विजयकुमार देशमुख (मालक)आणि खासदार जयासिध्देश्रवर (महाराज) यांनी स्वा:ता भेटून मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यासर्व गोष्टी लक्षात घेऊन मा. पालक मंत्री व श्री. दत्तामामा भरणे यांनी दि.7/1/2022 रोजी मा. जिल्हाधिका-यांना ताडी दुकानांना स्थ्गिती देण्याचे आदेश दिले. तरीही मा. जिल्हाधिकारी यांनी ताडी दुकानाना स्थ्गिती दिली नाही. उलट दि.1/2/2022 पासून ताडी दुकाने चालु केले आहेत यात जोडभावी पेठे (कन्नाचौक), जुनाविडी घरकुल सागर चौक व जुनाविडी घरकुल एच.ग्रुप आणि घोंगडेवस्ती भाजी मंडई परिसरात दाट लोकवस्तीत ताडी दुकाने चालु केले आहेत. त्यामुळे ताडी पिणारे लोक हे मददधुंद होऊन, रस्त्यावर येणा-या जाणा-या लोकांना, विशेषता महिलांना छेडछाड करणे, रस्त्यावरच झिंगणे, दुकानाजवळ पार्किंगची सोय नाही, सायकली, व दुचाकी वाहन रस्त्यावरच लावणे, त्याच बरोबर परिसरातील रहिवासी ताडी दुकानाना विरोध केलेले लोक राहतात त्यामुळे त्यांच्याकडे दुकानातील मालक व नोकरवर्ग अकस नजरेने पाहणे, अशा अनेक प्रकारामुळे तक्रार व भांडण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजेच शहरातील ज्या ज्या- ठिकाणी ताडी दुकाने आहेत त्या त्या ठिकाणी भांडणे होऊन कायदा व सुव्यवस्था प्रश्र निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही
तरी माननियांनी शहरातील दाट लोकवस्तीत असलेल्या ठिकाणी काढण्यात आलेल्या ताडी
दुकाने बंद करुन शांतता व सुव्यवस्था आबाधित ठेवावे आणि गोर गरिब कष्टकरी लोकांना या सर्व त्रासापासून मुक्त करावी ही नम्र्र विनंती. असे नमुद करण्यात आले आहे.
ताडी दुकाने विरोधी संघर्ष समितीच्या वतीने विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणा-या शिष्ट मंडळात सोहेल शेख, गणेश बोडडू, विठठल कु-हाडकर, गुरुनाथ कोळी, पप्पु शेख, सलीम शेख, संजीव शेटटी, रेखा आडकी आदिंचा सहभाग होता.