लोकदर्शन 👉 मोहन भारती
प्रसार माध्यमांचा मनमानी कारभार सुरू, सर्वच घटकांच्या प्रसिद्धी चे काम प्रिंट मीडिया, ऑनलाईन मिडियाच्या माध्यमातून होणे आवश्यक असताना बहुतांश पेपरचे मालक, संपादक, प्रतिनिधी एसीबीच्या कारवायांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. प्रसार माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटल्या जाते.चौथा स्तंभ म्हणवणाऱ्या वृत्तपत्रांनी लाचखोरांच्या बातम्या प्रसिद्ध करणे तितकेच गरजेचे असताना बहुतांश पेपरमध्ये एसीबीच्या कारवायांना प्रसिद्धी मिळत नाही.ही गंभीर दखल पात्र बाब आहे.२४,२५ जानेवारीला व काल असे तीन ट्रॅप नांदेड युनिट द्वारे लाचखोरांवर लावण्यात आले आणि तीन्ही सापळे यशस्वी झाले आहेत.तीन्ही कारवायांना म्हणावी तेवढी प्रसार माध्यमांनी प्रसिद्धी मिळवून दिली नाही.जी प्रसार माध्यमं अडाणीपणामुळे,अनभिज्ञतेमुळे लाचखोरांच्या बातम्या घेत नाहीत,त्यांचे निराळे.*ज्या संपादकांना, प्रतिनिधींना एसीबी कडून मेल द्वारे, व्हाट्सअप द्वारे प्रेस नोट,ट्रॅप केस रिपोर्ट प्राप्त होऊन देखील जे पेपर एसीबीच्या पथकाने केलेल्या कारवाईची जाणीवपूर्वक प्रसिद्धी देत नाहीत,त्या प्रसार माध्यमांचा जाहिरपणे निषेध,निषेध,निषेध*⚫⚫⚫
✍️✍️✍️
पत्रकार
संजय ब्रम्हानंद पाटील चिखले मरवाळीकर
7767912933