लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा- गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रात सक्रिय असणारी गोंडवाना विद्यापीठ टीचर्स संघटनेने प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडले असून ही संघटना शैक्षणिक विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन संघटनेचे आधारस्तंभ आणि सभेचे अध्यक्ष डॉ प्रदीप घोरपडे यांनी केले आहे.
गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनची सभा शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती.या सभेत प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय गोरे उपाध्यक्ष डॉ. सुनील नरांजे डॉ. नंदाजी सातपुते, डॉ. विजय वाढई , सिनेट सदस्य अक्षय धोटे व डॉ.प्रशांत ठाकरे , प्राचार्य मेश्राम इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते
यावेळी बोलताना डॉ.घोरपडे म्हणाले की गोंडवाना यंग टीचर संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या उन्हाळी- हिवाळी सुट्ट्या, विद्यार्थी फी माफीचा प्रश्न, पीएचडी संशोधनातील अनेक समस्या,प्राध्यापक मानधनाचा प्रश्न असे अनेक प्राध्यापक व विध्यार्थी हिताचे अनेक प्रश्न संघटनेने कसोशीने सोडवलेले असून ही संघटना विद्यापीठाच्या गुणवत्ता पूर्ण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे यांनी प्रास्ताविकातून संघटनेच्या कार्याची माहिती देऊन संघटना प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी निरंतर कार्य करीत असल्याचे सांगून संघटनेच्या विभाग समन्वयकांनी अधिक सक्रिय होण्याची गरज असल्याचे प्रतिपादित केले.यावेळी सिनेट सदस्य प्रशांत ठाकरे आणि सुदर्शन दिवसे यांनी आपले मनोगत मांडून संघटना सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी गोंडवाना यंग टीचर्स संघटनेचे सदस्यत्व प्राप्त केलेल्या सदस्यांचा मान्यवर अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करून त्यांचा गौरव करण्यात आला.
या सभेचे संचालन आणि आभार संघटनेचे सचिव डॉ.विवेक गोरलावार यांनी मानून संघटनेच्या विविध कार्याची माहीती दिली.यावेळी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना यंग टीचर्स चे अनेक पदाधिकारी व विभाग समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्नेहभोजनानंतर संघटनेच्या सभेचा समारोप करण्यात आला.