लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
⭕वंचित,बहुजन,दलीत,मुस्लिम याचा बुलंद आवाज दाबण्याचा प्रयत्न* —- *शेख महेबुब भाई.*
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदुर —-
3 फेबु.रोजी मेरठ येथून दिल्ली येथे जात असताना मजलिस ए ईत्तेहादुल मुस्लेमिन म्हणजे च AIMIAM या राजकीय पक्षा चे नेते बॅ . असदुद्दीन ओवैसी याच्या गाडीवर बंदूकधारी लोकांनी हमला करून त्यांना जिवे मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे,हा वंचित,दलीत,मुस्लिम याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून ते कदापि आम्ही असे हल्ले सहन करणार नाही. संसद रत्न बँ.असदुद्दीन ओवेसी यांच्या रक्षणाची जबाबदारी ग्रहमंत्रालयानी घ्यावी,अशी मागणी भारतीय मुस्लिम परिषदे चे विदर्भ प्रमुख,शेख महेबुबभाई यांनी तहसीलदार जिवती याना निवेदन दिल्या नंतर आपले विचार व्यक्त करताना केली,.या प्रसंगी इतर समाज बांधव सुद्धा हजर होते. जिवती येथील नगरसेवक जमालुद्दीन शेख,जब्बार शेख,निजाम शेख मुजाहेद देशमुख अशपाक सय्यद, गफ्फार शेख,सत्तार शेख, शमशोड्डीन शेख,रहीम शेख,मतीन शेख,हुजुर शेख ,सलमान शेख ,सह इतर नागरिक हजर होते.
तसेच कोरपना येथे तालुका कार्यकारणी तर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी नासीर खान म्हणाले AIMIAM प्रमुख बँ.ओवैसी साहेब याना झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी याची मागणी निवेदन द्वारे राष्ट्रपती,प्रधानमंत्री,गृहमंत्री याचे कडे केली आहे. ओवैसी हे देशा चे नेते असून संसदरत्न आहे ते चार वेळा हैद्राबाद येथून निवडून आले आहे.त्याचेवर झालेला हल्ला निषेधार्थ असून सर्व स्तरातून याचा निषेध केला जात आहे कोरपना येथे निवेदन देताना नासीर खान,AIMIAM चे तहसील अध्यक्ष रफिक शेख, गडचांदूर उपाध्यक्ष रऊफ शेख, शेख कादर भाई,सोहल शेख, व इतर पदाधिकारी हजर होते.