लोकदर्शन 👉 राहुल खरात सर
आटपाडी दि ७ फेब्रुवारी आटपाडी ग्रामपंचायत वार्ड नंबर 1 विठ्ठलनगर येथे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व नवबौद्ध घटकांच्या विकास योजनेतून पाणी पुरवठा पाईप लाईन करणे चालु असलेल्या कामाची पाहणी आटपाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील व अखिल भारतीय वकील संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲडवोकेट श्री.धनंजय पाटील यांनी केली.
अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री. बाळासाहेब मेटकरी व श्री. प्रकाश मरगळे, श्री. आप्पा खरात, ठेकेदार श्री. सोमनाथ आडसुळ, श्री. अमित फडतरे व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
⭕आमदार श्री अनिल भाऊ बाबर व श्री.तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सौ.वृषाली पाटील यांच्या या ३ वर्षाच्या कार्यकाळात अनेक सिमेंट रस्त्यांची कामे, पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करणे, बंदिस्त गटरीची कामे, पेव्हींग ब्लॉग बसवणे, हायमास्ट लाईट पोल लावणे अशा प्रकारची अनेक विकासकामे वरचेवर चालु असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
⭕ आटपाडी ग्रामपंचायत ला आणखी आर्थिक नीधी प्राप्त झाला आहे, त्यामुळे उर्वरित सर्वांचीच विकास कामे वेळेत पुर्ण होतील, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच सौ.वृषाली पाटील यांनी केले.
⭕आटपाडीतील जनतेने ज्या विश्वासाने गावची जबाबदारी दिली,त्याच विश्वासाने दिलेली आश्वासने आमचे कार्यकाळात पूर्ण करु असे मतही सरपंच वृषाली पाटील यांनी व्यक्त केले.