कोरपना नगर पंचायत च्या अध्यक्ष पदी दुसऱ्यांदा विराजमान होणार काँग्रेसच्या सौ,नंदाताई बावणे।                 

लोकदर्शन 👉 मोहन भारती


,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
कोरपना नगर पंचायत च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक 11 फेब्रुवारी ला होत आहेत,
यावेळी सुद्धा कोरपना नगरपंचायत च्या निवडणूक काँग्रेस पक्षाचे नेते विजय बावणे यांनी निर्विवाद स्पष्ट बहुमत प्राप्त करून, परत एकदा नगरपंचायत वर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार हे स्पष्ट झाले आहेत,येत्या 11 फेब्रुवारी ला होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सौ,नंदाताई विजयराव बावणे यांचा विजय निश्चित समजला जातो आहे,
नगराध्यक्ष पदी त्या दुसऱ्यांदा विराजमान होणार आहेत,2016 मध्ये नगर पंचायत च्या प्रथम अध्यक्षा बनल्या होत्या,
या वर्षी झालेल्या नगर पंचायत च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विरोधात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लढा दिला,मात्र निराशा झाली, विजय बावणे यांच्या नेतृत्वाला नागरिकांनी कौल दिला,
विजय बावणे यांचे चिरंजीव नितीन बावणे यानी प्रथमच निवडणूक लढवली,काकांना पराभूत करून विजय मिळवला,
या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 12 जागेवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले आहे,भाजप ला 4 तर शेतकरी संघटनेला एका जागेवर समाधान मानावे लागले,
राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय बावणे यांच्या नेतृत्वाखाली नगर पंचायत निवडणूक लढवून घवघवीत यश मिळवले आहे,
नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला साठी राखीव असल्याने 11 तारखेला नगराध्यक्ष पदी सौ,नंदाताई बावणे यांची बिनविरोध निवड होईल अशी अपेक्षा आहेत तसेच उपाध्यक्ष पदी कॉग्रेसचेच नगरसेवक इसमाईल शेख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे,
,,,,,,,,,,,,,,,,,,,
1962 पासून कोरपना शहरात बावणे घराणे चे वर्चस्व प्रस्थापित झाले आहेत,1962 मध्ये कोरपना ग्राम पंचायत चे प्रथम सरपंच म्हणून विजय बावणे यांचे वडील स्व,चिंतामणराव बावणे यांनी कार्य केले,त्या नंतर विजय बावणे यांनी सरपंच पद भूषविले,2016 मध्ये ग्रामपंचायत चे रूपांतर नगर पंचायत मध्ये झाले प्रथम नगराध्यक्ष चा मान विजय बावणे यांच्या पत्नी सौ,नंदाताई बावणे यांना मिळाला,
यावर्षी पुनश्च सौ,नंदाताई बावणे व पुत्र युवा नेते नितीन बावणे यांनी विजय मिळवून नगरपंचायत मध्ये प्रवेश केला आहे,
कोरपना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहून विकास कामे केली जाईल,अशी ग्वाही विजय बावणे यांनी दिली आहे, शहरातील मतदारांनी टाकलेल्या विश्वास ला तडा जाऊ देणार नाही असे म्हणाले,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *