लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,
विदर्भातील पहिल्या जैवइंधन प्रकल्पचे भूमिपूजन राजुरा तालुक्यातील भुरकुंडा येथे नुकतेच संपन्न झाले,
अनंतराव क्लीनफियुल्स इंडिया प्रा, लिमिटेड या कंपनीच्या वतीने भुरकुंडा येथे उभारण्यात येणारा जैवइंधन प्रकल्प प्रत्येक गावात इंधन क्रांती घडवून आणेल असे कंपनी चे संचालक प्रशांत चटप यांनी सांगितले,हा प्रकल्प विदर्भातील शेतकऱ्यांना संजीवनी देणारा ठरणारा असून यासाठी 50 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहेत,या प्रकल्पामुळे तालुक्यातील 10 हजार बेरोजगार युवकाना रोजगार उपलब्ध होणार आहेत,सोबतच 60 टक्के वाहनातील प्रदूषण कमी होईल असे प्रशान्त चटप यांनी सांगितले,या कंपनी संबंधित अधिक माहिती देताना प्रशांत चटप यांनी सांगितले की,या कंपनीला लागणारा कच्चा माल हा शेतातील बांधावर जाळला जाणारा काडीकचरा विकत घेतला जाईल,शेतकऱ्यांना हत्ती गवत हे नगदी पीक म्हणून उपलब्ध होणार आहेत,हे गवत कंपनी शेतकरी कडून हमी भावाने विकत घेईल त्या मुळे शेतकऱ्यांना एकरी 1 ते दीड लाख रुपयांचा लाभ होईल,
माजी राष्ट्रपती डॉ, अब्दुल कलाम यांनी 2030 पर्यंत भारताला इंधन क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्याच्या संकल्पनेतून डॉ, श्याम शिवाजी घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली एम,सी, एल,मुंबई 2030 पर्यंत देशात 5500 तालुक्यामध्ये जैवइंधन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्धार केला होता,या प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणात जैविक खताची निर्मिती होणार आहेत,
या पायाभरणी समारंभात संचालिका श्रीमती कल्पना अनंतराव चटप,संचालक नागेश अनंतराव चटप,संजय शेडके, ठेकेदार भोयर,व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,