लोकदर्शन 👉 मोहन भारत
राजुरा :– सेवा कलश फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी जिवती तालुक्यातील आसपुर आणि धोंडा अर्जुनी येथील कुपोषित बालकांच्या घरी तसेच अंगणवाडीला प्रत्येक्ष भेट देऊन पाहणी केली, येथील कुपोषित बालकांची आजची वस्तूस्थिती जानून घेतली.
दिनांक 11 जुलै 2021 रोजी जिवती येथे सेवा कलश फाऊंडेशनच्या विद्यमाने तालुक्यातील कुपोषित बालकांना आमदार सुभाष धोटे यांच्या सामाजिक दायित्वा अंतर्गत सकष आहार कीट चे वितरण करण्यात आले होते. सध्या परिस्थितीत ही मुले कशी आहेत याचा आढावा घेतला असता हळूहळू या मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत असल्याने आनंद होत आहे तसेच ही परिस्थीती आटोक्यात आनण्याच्या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
या प्रसंगी जिवतीचे बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश जाधव, पर्यवेक्षका माया बारापत्रे, धोंडागुडा अर्जुनीच्या आंगणवाडी सेविका अनुसया राठोड, आसापुर च्या लता दुधे, आसापुर येथील लाभार्थी गंगा संतोष आत्राम , सुनील देवराव गेडाम, दुल्हन आनंदराव वेडमे टेकमांडवा येथील सपना सखाराम चव्हाण, निखिल कैलास जाधव, शिवानी माधव पवार यासह स्थानिक गावकरी उपस्थित होते.