लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕कोरपना तालुक्यात विविध विकासकामांचा शुभारंभ
कोरपना – ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हाच उद्देश असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी केले. कोरपना तालुक्यातील विविध गावातील विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
तालुक्यातील कमलापुर येथे स्थानिक निधी अंतर्गत समाजभवन बांधकाम करणे – 15 लक्ष, येरगव्हान येथे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळा इमारत बांधकाम करणे – 13 लक्ष, बोरगांव (खु.) ते बोरगांव (बु.) रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे – 30 लक्ष, धोपटाळा येथे जिल्हा परिषद शाळा इमारत बांधकाम करणे – 13 लक्ष, खैरगाव पुलावरील रपटा बांधकाम करणे – 5 लक्ष, कोठोडा (बु.) येथे पशु वैद्यकीय दवाखाना बांधकाम व निवास इमारतीचे बांधकाम करणे – 23 लक्ष, कोठोडा (बु.) येथे जनसुविधा निधी अंतर्गत स्मशानभूमी सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे – 3 लक्ष, गोविंदपुर अंगणवाडी इमारत बांधकाम करणे – 9.40 लक्ष रुपये निधी च्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी जि. प. सदस्य कल्पनाताई पेचे, विनाताई मालेकर, पं. स सदस्य संभाजी कोवे, शाम रणदिवे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, सिताराम कोडापे, भाऊजी चव्हाण, सुरेश मालेकर, संजय तोडासे, सरपंच सत्यपाल आत्राम, दीपक राठोड, अनिता किन्नाके, जीवतोड, रमेश मेश्राम, विनोद मारकोल्हे, तानु नैताम, सतीश झाडे, सुधाकर राठोड, सुनील कोचारे, शामराव उईके, अनिल मेश्राम यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.