लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕विहिरगाव येथे आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते ४. ३७ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन.
राजुरा :– विहिरगाव चे सरपंच अॅड. रामभाऊ देवईकर यांनी क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून गावात आवश्यक विकास कामांसाठी निधी उपलब्ध करण्यासंदर्भात मागणी केली. त्यांच्या मागणीला यश येऊन आमदार सुभाष धोटे यांनी विहिरगाव येथे ४ कोटी ३७ लक्ष रूपये निधीची विकासकामे मंजूर करून भुमीपुजन केले. यात प्रजिमा १६ मधील राजुरा- चनाखा- विहीरगाव – धानोरा किमी. १३/३०० मधील विहीरगाव जवळील पुलाचे बांधकाम करणे, किंमत ४ कोटी ७ लक्ष, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत मौजा विहीरगाव येथे रमेश नळे ते भास्कर साळवे यांचे शेतापर्यंत पांदण रस्त्याचे बांधकाम करणे, किंमत ३० लक्ष रूपये निधी च्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कृ.उ.बा.स सभापती आबाजी पाटील ढुमणे, सभापती मुमताज जावेद अब्दुल, प स सदस्य तुकाराम माणुसमारे, कुंदाताई जेणेकर, विहिरगाव सरपंच रामभाऊ देवईकर, उपसरपंच नीलकंठ खेडेकर, माजी सरपंच उध्दव पाटील साळवे, तमुस अध्यक्ष रविकांत होरे, इर्शाद शेख, पंढरीनाथ देवईकर, बैजनाथ खेडेकर, शुभम वाघमारे, वसंत आसमपल्लीवार, संपत आसमपल्लीवार, अरुण रागिट, मारोती वनकर, मनोहर धुडसे, सोमेश्वर देवईकर, उध्दवराव खेडेकर, माधुरी चिडे, लिलाबाई भिवनकर, पूजा वाघमारे, छाया मडावी, अरूणा वांढरे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.