लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने राजुरा तालुक्यात मंजुर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्याच शुभहस्ते करण्यात आले. या सर्व विकासकामांवर ६ कोटी ५५ लक्ष रूपये निधी खर्च होणार आहे.
यात अर्थसंकल्पीय निधी अंतर्गत प्रजिमा १६ मधील राजुरा- चनाखा – विहीरगाव – धानोरा किमी. २०/६९० मधील सिंधी जवळील पुलाचे बांधकाम करणे, किंमत १ कोटी ७३ लक्ष, प्रजिमा १६ मधील राजुरा- चनाखा- विहीरगाव – धानोरा किमी. १३/३०० मधील विहीरगाव जवळील पुलाचे बांधकाम करणे, किंमत ४ कोटी ७ लक्ष, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत मौजा विहीरगाव येथे रमेश नळे ते भास्कर साळवे यांचे शेतापर्यंत पांदण रस्त्याचे बांधकाम करणे, किंमत ३० लक्ष, मौजा पंचाळा येथील हनुमान मंदिर ते नदीघाट पर्यंत पांदण रस्ता, किंमत ३० लक्ष, स्थानिक विकास निधी अंतर्गत मौजा नलफडी येथे प्रवासी निवारा व स्वप्नील टेकाम ते रवींद्र मडावी, नितीन धानोरकर ते रामू आत्राम, कालिदास पाकुलवार ते तुकाराम उरकुडे यांचे घरापर्यंत सी.सी रस्त्याचे बांधकाम करणे, किंमत १५ लक्ष रूपये निधी च्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कृ.उ.बा.स सभापती आबाजी पाटील ढुमणे, सभापती मुमताज जावेद अब्दुल, प स सदस्य तुकाराम माणुसमारे, कुंदाताई जेणेकर, सरपंच सुवर्णा रायपल्ले, उपसरपंच रामभाऊ ढुमणे, नलफडी सरपंच अमित टेकाम, विनोद वडस्कर, विहिरगाव सरपंच रामभाऊ देवईकर, उपसरपंच नीलकंठ खेडेकर, इरशाद शेख, रविकांत होरे, मनोहर धुडसे, माजी सरपंच वर्षाताई पिंगे, संजय कुळमेथे, पुरुषोत्तम पिंगे, पंचाळा सरपंच शोभाताई मडावी, उपसरपंच आकेश चोथले, सुधाकर पाटील गिरसावळे, चनाखा उपसरपंच विकास देवाळकर, मुर्ती चे सरपंच धनराज रामटेके, मारोती मोरे, धनराज चिंचोलकर, चेतन जयपुरकर, यासह स्थानिक नागरिक उपस्थीत होते.