लोकदर्शन 👉 मोहन भारती
*⭕गोंडवाना यंग टीचर्सने दिला होता आंदोलनाचा इशारा*
*गडचिरोली*-गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने गोंडवाना विध्यापिठ परिक्षेत्रातील संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकाच्या विविध परीक्षा संबंधी पेपर सेटर, परीक्षक,निर्देशी,नियामक,केंद्र संचालक ,भरारी पथक सदस्य इत्यादी कामाचे मानधन देयके लवकरात लवकर देण्यासंदर्भात मा. कुलगुरू,मा. कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांना संघटनेचे सचिव डॉ.विवेक गोरलावार,उपाध्यक्ष डॉ.नंदाजी सातपुते,डॉ राजू किरमिरे यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत विद्यापीठ स्थरावर जलदगतीने कार्यवाही होऊन प्राध्यापकच्या परिक्षा संबंधित विविध कामाचे देयके तयार करण्याच्या कामाला गती प्राप्त झाली आहे.या पार्श्वभूमीवर विध्यापिठ सूत्राने दिलेल्या माहिती नुसार अनेक प्राध्यापकाचे देयकांचे धनादेश विद्यापीठात तयार असून हे संघटनेच्या कार्याचे मोठे यश मानले जाते.
महाविद्यालयीन प्राध्यापकांचे परीक्षा संबंधी कामाचे मानधन अनेक वर्षांपासून प्रलंबित होते या संदर्भात अनेकदा गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने कुलसचिव आणि परीक्षा नियंत्रक यांची भेट घेतली होती त्यामुळे विध्यापिठ स्तरावर हालचाली होऊन कामाला गती प्राप्त झाली असुन अनेकांचे धनादेश तयार होत आहेत.संघटनेच्या प्रयत्नाला सकारात्मक प्रतिसाद देवुन प्राध्यापकाचे प्रलंबित देयके काढण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल विद्यापीठाचे मा. कुलगुरू, मा. प्र कुलगुरू, मा.कुलसचिव व मा. वित्त व लेखाधिकारी यांचे संघटनेने अभिनंदन केले आहे.