लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरोनाच्या जागतिक महामारीने मानसिक स्वास्थ्यावर मोठा परिणाम केला. देशातल्या सर्वच वयातील नागरिकांना मानसिक ताण आणि समस्यांना सामोरे जावे लागले. अर्थमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आणि केवळ आरोग्यच नाही तर सर्व नागरिकांसाठी मानसिक आरोग्याचे प्रश्नही हाताळणे गरजेचे आहे, हे या अर्थसंकल्पाने अधोरेखित केले आहे.
आज प्रदूषण मुक्त जीवनशैली जगण्याची गरज आहे. वाहतुकीत पेट्रोल वर मोठा खर्च होतो. शिवाय प्रदूषण देखील. त्यावर पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवे चार्जिंग स्टेशन्स व सौर ऊर्जेसाठी सोलर पॅनलवर आधारीत वीज प्रोजेक्ट्सच्या विकासावर भर देण्याची घोषणा आजच्या आजच्या अर्थसंकल्पातून करण्यात आली. हे कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी दिली.