लोकदर्शन ÷ मोहन भारती
●राजुरा विधानसभा क्षेत्रातील अपूर्ण रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करा –
आ. सुभाष धोटे
गडचांदूर -,,
राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक रस्त्यांची कामे मंजूर असून कंत्राटदार व बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे कामामध्ये दिरंगाई होत आहे. त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. आमदार सुभाष धोटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांची दि. ०१ ला राजुरा येथे बैठक घेऊन त्वरित कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. अन्यथा स्वतः आंदोलन करण्याचा इशारा आमदारांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
रस्त्यांची कामे तात्काळ करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही काही ठिकाणी दिरंगाई होत आहे. स्थानिक नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलने करण्याची वेळ येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांचा अंत पाहू नये. क्षेत्रात सुरू असलेल्या सर्व रस्त्यांच्या कामांशी संबंधित ज्या कंत्राटदारांनी कामे घेतलेली आहेत त्यांना तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असेल तर अशा कंत्राटदारांकडून कामे काढून दुसर्याला देऊन काम पूर्ण करावे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी सर्व बांधकाम मंडळ चंद्रपूरच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांना दिल्या.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता सुनिल कुंबळे, सा. बा. विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता भास्कर वाला, राजुरा, गडचांदूर, जिवती व गोंडपिपरीचे उपविभागीय अभियंता उपस्थित होते.