लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– आज संसदेत सादर करण्यात आलेल्या बजेट मध्ये देशातील सर्व सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात त्यांना तातडीने दिलासा देणाऱ्या विशेष तरतूदी दिसून येत नाही. केवळ उद्याचे रंगीत चित्र दाखविणारे स्वप्नवादी बजेट मांडण्यात आले आहे. या बजेटमध्ये सर्व सामान्य नागरिकांची घोर निराशा झाली आहे. विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, महिला, नोकरदार, व्यापारी, गरीब वर्ग, मध्यम वर्ग अशा जवळपास सर्वच क्षेत्राला या बजेट मध्ये फारसे महत्त्व दिलेले नाही. कोरोना संकट लक्षात घेता आरोग्य, शिक्षण क्षेत्राला अधिक निधी उपलब्ध व्हायला हवा होता मात्र सरकारने येथेही केवळ निराशाच केली आहे.