.
लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕गोंडवाना यंग टीचर्स ची मागणी.
राजुरा :– गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती ही चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी,नक्षलग्रस्त व दुर्गम भागाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी झालेली आहे.या पार्श्वभूमीवर गडचिरोली परिक्षेत्रातील अहेरी येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्याबाबत चे निवेदन गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स असोसिएशनने कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांना दिली आहे.
अहेरी तालुका हा गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून गडचिरोली पासून 120किलोमोटर वर आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक सोयीपासून कोसो दूर आहेत. अहेरी हे विद्यापीठाचे उपकेंद्र झाल्यास सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, मूलचेरा वआष्टी येथील महाविद्यालयांना, प्राध्यापकांना आणि विध्यार्थ्यांना विद्यापीठाच्या विविध योजना आणि शैक्षणिक सोयी -सुविधा प्राप्त होतील.
या पार्श्वभूमीवर गोंडवाना यंग टीचर्स संघटनेने प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांचेशी चर्चा केली.विशेष म्हणजे विध्यापिठ व्यवस्थापन परिषदेने याआधी चंद्रपूर व अहेरी येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्याचा ठराव केला होता त्यापैकी चंद्रपूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू झाले मात्र अहेरी येथे आज पावेतो उपकेंद्र सुरू झाले नाही.
यावेळी प्र-कुलगुरू यांनी लवकरच अहेरी येथे विध्यापिठाचे उपकेंद्र लवकरच सुरू करणार असल्याचे संघटनेला आश्वासन दिले आहे. यावेळी गोंडवाना यंग टीचर्स चे मार्गदर्शक डॉ.प्रदीप घोरपडे, संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय गोरे, सचिव डॉ.विवेक गोरलावार, उपाध्यक्ष डॉ.नंदाजी सातपुते, सहसचिव, डॉ.प्रमोद बोधाने, डॉ.राजेंद्र गोरे, डॉ.विजय वाढई, सिनेट सदस्य डॉ.प्रशांत ठाकरे, डॉ.अक्षय धोटे, डॉ.सतीश कन्नाक,डॉ .राजू किरमिरे, डॉ.सुनील नारंजे डॉ.दिनकर चौधरी, डॉ.प्रफुल बन्सोड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.