लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,,
प्रजासत्ताक दिनी उमरेड येथे स्केटिंग ऍकॅडमी च्या वतीने वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक व ग्लोबल जिनियस रिकार्ड बुक करिता स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये चंद्रपूर येथील कारमेल अकॅडमी ,आय,सी, एस, इ,ची वर्ग 4 ची विद्यार्थीनी कु,युगाज्ञा चरंदास रामटेके हिने एक तास न थांबता हात पकडून स्केटिंग केले,व जागतिक पातळीवर नाव नोंदवून पराक्रम केला,या विशेष स्केटिंग रिकार्ड मध्ये विविध जिल्हा मधून 65 स्केटर नि सहभाग घेतला,
स्पर्धेचे उद्घाटन भारतीय सेनेचे सेवानिवृत्त मेजर संजय सतई यांच्या हस्ते झाले,पारितोषिक वितरण भारतीय सेनेचे सेवानिवृत्त कॅप्टन ज्ञानेश्वर पराते यांच्या हस्ते करण्यात आले,
युगाज्ञा रामटेके ला स्केटिंग प्रशिक्षक आतिष धुर्वे यांचे मार्गदर्शन मिळाले,
युगाज्ञा चे सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे,
पेल्लोरा येथील संजय गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे एम,सी, व्ही, सी, विभागात कार्यरत असलेले प्रा, डॉ, चरंदास रामटेके यांची ती मुलगी आहे,