लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना. ,, ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, कोरपना द्वारा संचालित वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोरपना येथे दि.३० जानेवारी ला भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार तथा जगाला सत्य व अहिसेंची शिकवण देणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी करण्यात आली,या प्रसंगी कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.डी.जी.खडसे होते,प्रमुख अतिथी म्हणून प्रा.श्री कुकडे , विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.पी.बी.बोंडे, विजय बोरडे ,भोयर , साधू बावणे,तथा समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. खडसे तसेच पर्यवेक्षक श्री.बोंडे यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे संचालन श्री. वि. एफ. पंदाम यांनी केले तर आभार मने यांनी मानले,
,