लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रत्येक विद्यार्थ्यांनी संकल्प बद्ध व्हावे आणि राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात स्वतःचे, आई वडीलांचे, शाळेचे, गावाचे नावलौकिक मिळवावे असे आवाहन इन्फंट जिजस सोसायटीचे सचिव तथा माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. तसेच इन्फंट कान्व्हेंट मध्ये शिकून पुढे यशस्वी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा उल्लेख करीत आपण सर्वांनी सुध्दा असेच मोठे व्हावे असे सांगीतले. या प्रसंगी त्यांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित सर्व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ठिक ७.४५ वाजता संस्थेचे सचिव अरुण धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी रामचंद्रराव धोटे महाविद्यालये प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.