लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕प्रेरणा महासंघ आणि ग्रामपंचायत यांचे संयुक्त आयोजन.
राजुरा :– मौजा कळमना येथे प्रेरणा महासंघ (उमेद) आणि ग्रामपंचायत कळमना यांच्या संयुक्त विद्यमाने हळदीकुंकू स्नेहमिलन मेळावा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन कळमनाचे सरपंच, काँग्रेस ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर सुभाष वाढई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महीलांचे सबलीकरण व सक्षमीकरण करणे काळाची गरज आहे. कारण प्रत्येक महिला ही कुटुंबातील रणरागिणी आहे. आज प्रत्येक क्षेत्रात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक महिलांनी आपल्या विकासासाठी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे आणि प्रत्येक पुरुषांनी त्यांना सहकार्य केले पाहिजे असे मत सरपंच नंदकिशोर वाढई यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेद व्यवस्थापीका डोंगरे मॅडम, प्रमुख पाहुणे तमुस अध्यक्ष महादेव ताजने, पाडवे मॅडम, ग्रा. प सदस्य साईनाथ पिंपळशेंडे, प्रेरणा महासंघाच्या अध्यक्ष मिनाताई भोयर, कार्याध्यक्ष वैशाली आस्वाले, सचिव मनीषा धनकट, माजी सरपंच नुतन आत्राम, सारिका बोढाले, सुनीता वाढ़ाई, मनीषा आंबीलकर, रवीना चिंचोलकर, मंजुषा आस्वले, सुनिता धांडे, कविता ईदे, सुषमा चिंचोलकर, सपना मेश्राम, संगीता उमाटे, सीमा क्षीरसागर, वंदना गौरकार, संगीता कुकुड़े, छाया गौरकार, सुनीता नागोसे, शीला मेश्राम, शुभांगी गौरकार, निलीमा सुमटकर, स्नेहा आस्वले, सोनू सुमटकर यासह अनेक महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन सुचिता धांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मनिषा धनकट यांनी मानले.