लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*⭕आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला रविवारच्या आयोजनाचा आढावा*
*चंद्रपूर :* पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ देशाचाच विचार करतात. याच विचारांचा प्रवाह प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी पंतप्रधान मोदी ३० जानेवारीला भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांशी ‘मन की बात’ करणार आहेत. हा कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचावा, अशी सूचना महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
‘मन की बात’च्या तयारीच्या अनुषंगाने त्यांनी डिजिटल माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करीत मा. मुनगंटीवार यांनी बोलण्यास सुरुवात केली. सोनिया गांधी यांना राहुल यांना पंतप्रधान झालेले पहायचे आहे. शरद पवार यांना सुप्रिया सुळे राष्ट्रीय नेतृत्व हवे आहे. उद्धव ठाकरे यांना आदित्यला मुख्यमंत्रीपदी बघायचे आहे. परंतु पंतप्रधान मोदी हे केवळ राष्ट्रहितासाठी काम करीत आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात किमान ३०० बुथवर ‘मन की बात’ प्रसारित व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘मन की बात’च्या माध्यमातून पंतप्रधान मोदी जे बोलतील ते घराघरांत पोहोचावे. सूक्ष्म नियोजनाच्या माध्यमातून हे शक्य होईल. कोविडची परिस्थिती पाहता सर्वांनी स्वत:च्या व ईतरांच्या आरोग्याची योग्य काळजी घेत या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या माध्यमातून प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. हाच सन्मान चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला मिळायला हवे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पंतप्रधान देशाशी संवाद साधत आहेत. याच डिजिटल तंत्रज्ञानाची प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने कास धरावी. प्रत्येक भाजप कार्यकर्त्यासाठी ३० जानेवारी हा दिवस एखााद्या उत्सवापेक्षा कमी नाही. हा उत्सव योग्य प्रकारे साजरा करावा, असे आवाहनही आ. मुनगंटीवार यांनी केले.
*अडीच हजार जागांवर स्थायी व्यवस्था*
‘मन की बात’ हा कार्यक्रम अधिक व्यापकपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात अडीच हजारांवर स्थायी व कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी नियोजन करावे, असे आ. मुनगंटीवार यांनी सुचविले. यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाड़े , राजेन्द्र गांधी , उपमहापौर राहुल पावड़े, डॉ दीपक भट्टाचार्य , सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवि गुरनुले आदिंची उपस्थिती होती.