By : Mohan Bharti
दहा हजार रुपये दर झाल्याने शेतकरी आनंदी
तेलंगणा मधील कापूस महाराष्ट्रात
गडचांदूर: विदर्भातील पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाचे बाजारभाव दहा हजार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले , अल्प उत्पन्न व अनेक संकटांना झेलून शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पन्न घेतले .
सुरवातीला कापसाचे दर कमी होते घटते उत्पन्न व वाढती कापसाची मागणी पाहता सध्या कोरपणा तालुक्यातील सर्वच जिनिंगमध्ये कापसाचे दर हे दहा हजारांवर गेले आहे . असेच दर वाढत राहिले तर पांढऱ्या सोन्याला विक्रमी दर मिळू शकते. कापसाचे उत्पन्नात आलेली घट लक्षात घेता कापसाला चांगले दर मिळू लागल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.यावर्षी एकरी उत्पन्न हे 3 ते 4 क्विंटल आल्याने , कापसाची कमतरता जाणवत आहे देशांतर्गत बाजापेठेत कापसाला मोठी मागणी आहे. कापसाला अर्थशास्त्राचा मागणीचा सिद्धांत लागू पडते . भविष्यात कापसाचे दर हे चढेच राहण्याची शक्यता आहे.रोशन आस्वले , कापूस अडते तथा युवा शेतकरी