लोकदर्शन 👉 मोहन भारती
गाडचांदूर °÷अल्ट्रा टेक सिमेंट कंपनी (माणिकगड सिमेंट गडचांदुर)
यांना शासनातर्फे नोकारी कुसुंबी येथे लाईमस्टोन ची लिझ माइन्स मंजूर केलेली असून तेथे लाइमस्टोन ला क्रश करून सदर क्रश केलेली चुनखडी माणिकगड सिमेंट कंपनी च्या सीमेंट प्लांट गडचांदूर येथे कन्वेयर बेल्ट व रोप वें द्वारे वाहतूक करण्याची शासनाने परवानगी दिलेली आहे. सदर रोपवे व कन्व्हेअर बेल्ट हे सिंचन विभागाच्या मालकीच्या असलेल्या अमल नाला मध्यम सिंचन प्रकल्पाच्या मध्यातून जात असून त्याबाबत काही अटी परवानगी देताना सिंचन विभागाने घालून दिलेल्या आहेत. ज्यात ध्वनि प्रदूषण होणार नाही तसेच धरणाच्या परिसरात चुनखडीचे दगड कन्व्हेअर बेल्ट अथवा रोपे मधून अमल नाला डॅम परिसरात पडणार नाही अशी मुख्य अट आहे.
माणिकगड सिमेंट कंपनी ला प्लांट 1 मध्ये रोप वें द्वारा तसेच एक्स्टेन्शन प्लांट क्रमांक 2 मध्ये कन्वेयर बेल्ट द्वारा चुनखडी वाहतुकीची परवानगी मिळालेली आहे सदर कन्व्हेअर बेल्ट आशिया खंडातील तृतीय क्रमांकाचा लांबीचा बेल्ट आहे. त्याची लांबी 8 किमी असून प्रकल्प सुरू झाल्याबरोबर त्यात तांत्रिक बिघाड होऊन बरेच दिवस बंद होता. सदर कन्वेयर बेल्ट च्या डिझाइन मध्ये तांत्रिक बिघाड आढळल्यामुळे सदर कन्व्हेअर बेल्ट सुरूवातीच्या काळात बंद ठेवण्यात आलेला होता परंतु नंतर त्यात काही अंशी सुधारणा केली असता कन्व्हेअर बेल्ट वापर करून माणिकगड सिमेंट कंपनीला कूसुंबी नोकारि माईंस येथून चुनखडी वाहतूक शक्य झालेली आहे. परंतु माणिकगड सिमेंट कंपनीच्या सदर कन्व्हेअर बेल्ट मधून अमल नाला डॅम परिसरात व संपूर्ण मार्गात चुनखडीचे मोठे दगड कन्व्हेअर बेल्ट मधून पडणे सुरू झालेले आहे. सदर कॅन्वेयर बेल्ट व रोप वे हा तीन ठिकाणी मुख्य सार्वजनिक वाहतूक मार्गांना क्रॉस करीत असून या तिन्ही ठिकाणी कन्व्हेअर बेल्ट व रोप वें मधून पडणाऱ्या दगडां द्वारे रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या लोकांना बरेचदा गंभीर दुखापत झालेली आहे सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीने सदर तीनही रोड क्रॉसिंग वर रोड वरती देखाव्या पूर्ती सुरक्षा उपाययोजना केली आहे परंतु सदर उपाय योजनाही बिनकामाची ठरत असून गंभीर दुखापतिच्या सावटाखाली लोकांना सदर रस्त्यांवरून मार्गक्रमण करावे लागत आहे.
सोबतच अमल नाला धरण परिसरात अंदाजे 2 किलोमीटर लांब रोप वें व कॅन्वेयार बेल्ट मधून मोठ्या प्रमाणात चुनखडी पडत असल्याचे निदर्शनास येत असून सदर बाब ही परवानगी अटीचे उल्लंघन करणारी आहे. सदर बाबीची शहनिषा संपूर्ण रोप वें व कन्वेयर बेल्ट मार्गात पडलेल्या मोठ मोठ्याल्या चुनखडी च्य ढिगार्यातून दिसून येत आहे.
माणिकगड सिमेंट कंपनी अल्ट्रा टेक सिमेंट कंपनी च्य नोकरी कुसुंबि येथील माईन्स ते गडचांदूर येथील सीमेंट प्लांट पर्यंत असलेल्या रोप वे व कन्व्हेअर बेल्ट द्वारे पडत असलेल्या चुनखडी बाबत मौका चौकशी करावी तसेच शासनाने घालून दिलेल्या अटी प्रमाणे चुनखडी पडणार नाही याबाबत उपाययोजना करण्याबाबत कंपनीस बाध्य करावे. सदर मौका चौकशी वेळेस परिसरातील लोकांना या बाबत सूचना देण्यात यावी.
अमल नाला सिंचन प्रकल्प क्षेत्रात शासनाने मोठे पर्यटन स्थळ निर्माण कार्य सुरू केले असून लवकरच सदर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी वाढणार आहे व या पडणाऱ्या चुनखडी दगडांचा व कॅन्वेयर बेल्ट च्या कर्ण कर्कश आवाजाचा पर्यटकांना पुढे मोठा त्रास होणार आहे तरी शासनाने वेळीच उपयोजना करावी अन्यथा आम्हाला लोकतान्त्रिक आणि न्यायिक मार्गाने या बाबत आंदोलन उभारावे लागेल.असा इशारा
नगरसेवक तथा गटनेते
विक्रम नामदेवराव येरणे यांनी जिल्हाधिकारी यांना पाठीवलेल्या निवेदनात दिला आहे, निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हा रस्ते वाहतूक सुरक्षा समिती चे अध्यक्ष खासदार बाळूभाऊ धानोरकर, जिल्हा उद्योग केंद्र चे प्रबंधक, तसेच अधीक्षक अभियंता, सिंचन विभाग चंद्रपूर यांना पाठीवलेल्या आहेत,