By : Shivaji Selokar
जिल्हाधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय,उपविभागीय कार्यालय , पंचायत समिती इत्यादी कार्यालय परिसरातील काही वर्षापासून दैनंदिन कामाकरिता येत असलेल्या चंद्रपूर जिल्यातील ग्रामीण,शहरी भागातील लोकांच्या वाहनावर वाहतूक विभागामार्फत या परिसरातील सर्व जागा नो पार्किंग आहे अशे सांगून सामान्य जनतेची दंड वसुलीच्या माध्यमातून एक प्रकारे लूट होत होती त्यांची वाहने वाहतूक विभाग उचलून नेत होती अशे प्रकार नेहमी या परिसरात घडत होते.ही गंभीर बाब श्री.अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या लक्षात आली असता श्री.अनिल डोंगरे यांनी मा.आमदार श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री यांना दूरध्वनी द्वारे कळविण्यात आले असता मा.सुधीर भाऊ यांनी जिल्हाधिकारी साहेब व त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा द्या असे सांगण्यात आले.निवेदनात सर्व कार्यालयांनी इथे येणाऱ्या लोकांच्या वाहनाकरिता सर्वप्रथम पार्किंगची व्यवस्था करा. तरच वाहनावर कार्यवाही करा असा सब्बड सवाल करून आंदोलनाचा इशारा दिला. मा.अजय गुल्हाने साहेब जिल्हाधिकारी तसेच मा.प्रतीक पाटील वाहतूक अधिकारी मा. रोहन घुगे साहेब उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले असता.त्यांनी यानंतर अशा प्रकारची दंडात्मक कार्यवाही होणार नसून प्रत्येक विभागामार्फत पार्किंगची व्यवस्था केली जाणार अशे भेटीदरम्यान तोंडी आश्वासन दिले.यावेळी श्री.विकास जुमणाके उपसभापती प. स चंद्रपूर श्री.अतुल पोहणे तालुका महामंत्री भा. ज.यू.मो.श्री.गणपत चौधरी सरपंच. डॉ निब्रड हे उपस्थित होते. आता या कार्यालयात येणाऱ्या लोकांना रोडच्या साईटला किंवा कार्यालयाच्या बाजूच्या खुल्या जागेवर वाहने उभी केल्यास वाहतूक विभागामार्फत अश्या प्रकारची दंडात्मक कार्यवाही होणार नसून यामुळे लोकांच्या खिशाला कात्री बसणार नाही हे विशेष.