By : Mohan Bharti
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राबविलेल्या जगातील सर्वात मोठ्या कोविड लसीकरण मोहिमेस १६ जानेवारीला एक वर्ष पूर्ण झाले. या काळात मोदी सरकारच्या कोरोनाविरोधी लढाईस लसीकरणामुळे सुरक्षित आरोग्याची हमी मिळाली, असे गौवरोद्गार व्यक्त करीत चंद्रपूर शहरात योगदान देणाऱ्या आरोग्य सेवकांचे महापौर राखी कंचर्लावार यांनी अभिनंदन केले.
गेल्या वर्षी, १६ जानेवारी २०२१ रोजी, मनीष कुमार नावाच्या ३४ वर्षांच्या सफाई कर्मचाऱ्यास कोविड प्रतिबंधात्मक लसीची पहिली मात्रा देऊन या मोहिमेचा राष्ट्रीय स्तरावर आरंभ करण्यात आला. चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून पंधरा वर्षांवरील सुमारे दोन लाख 45 हजार नागरिकांना कोरोना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. सुमारे 65 टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा देखील पूर्ण केली असून, आता बूस्टर डोसदेखील सुरू झालेले आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोणाला हद्दपार करण्यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर देखील सहकार्य करीत आहेत. कोरोणाची तिसरी लाटदेखील थोपवून धरण्यासाठी सर्व पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापौर राखी कंचर्लावार यांनी केले आहे.