By : Mohan Bharti
गडचांदूर : औधोगिक नगरी गडचांदूर शहरात मागील महिनाभरात चर्चेत असणारा स्थानतरीत दारू दुकानाच्या नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा प्रस्ताव दि.10 जानेवारीला झालेल्या सभेत अखेर नामंजूर करण्यात आला .
मागील 9 डिसेंबर रोजी आयोजित सभेत .पक्षीय बलाबल पाहता 10 विषय घेऊन नगराध्यक्षांनी अचानकपणे सभा तहकुब केली होती.त्यावेळच्या विषय सुचित 14 वा विषय स्थलांतरित देशी दारू दुकानाचा होता.तिच तहकूब सभा दि.10 जाने.सायं 4 वा .आयोजित करण्यात आली होती .स्थानांतरित दारू दुकानाला विरोध बघता नागराध्यक्षांनी या विषयावर गुप्त मतदान घेण्याची सूचना केली .स्थानांतरित दारू दुकानाच्या बाजूने 6 मते तर विरोधात 11 मत्ते पडली तर 1 मत अवैध ठरले .सत्ताधारी कडून आटापिटा करून दारू दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न झाला मात्र विरोधकानी तो हाणून पडला हे विशेष!
औधोगिक नगरी गडचांदूर शहरात जवळपास 12 विदेशी,5 देशी दारूची दुकाने व बीअर शॉपी असा .मद्दशौकिनांचा लवाजमा शहरात असताना गडचांदूर नगरपरिषद मात्र नवीन दारू दुकानांना नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या प्रयत्नात आहे .शहरातील काही दारू दुकानाला अजूनही जनतेचा विरोध सुरू आहे.शहरातील दारू दुकाने हटवून शहरा बाहेर नेण्यासाठी मागणी होत असताना सत्ताधारी त्याला न जुमानता नवीन दारू दुकान आणण्याच्या बेतात असल्याने जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहेत,
येथील प्रभाग क्रं.3 मध्ये अतिशय वर्दळीच्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या मूख्य प्रवेशद्वार समोर चौकात असलेल्या श्रीमती सुमनबाई बाबुराव कोटावार यांच्या इमारतीत जयस्वाल वाईन मार्ट किरकोळ देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी न.प.कडे ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी केली आहे.स्थानिक नागरिक व विरोधी पक्ष नगरसेवकांचा याला तिव्र विरोध असून नवीन दारू दुकानाला आता पुन्हा ना-हरकत देवु नये अशी विनंती सुद्धा येथील काही नागरिकांनी निवेदनाद्वारे नगरपरिषदेला केली होती . याठिकाणी दारू दुकान सुरू झाले तर स्थानिक नागरिकांचा मनस्ताप वाढणार आहे.कारण ज्या इमारतीत हे दारू दुकान सुरू होणार आहे त्याच्या आजुबाजुला निवासी क्षेत्र असून येथील प्रत्येक कुटुंबातील मुले शिक्षण घेत असल्याने भविष्यात दारूच्या आहारी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मुख्य म्हणजे या इमारतीच्या जवळ पोलीस स्टेशन,शासन मान्य गरीब व निराधार मुला मुलींचे वसतीगृह आहे.यांच्यावर सुद्धा वाईट परिणाम होऊ शकतो असे एकना अनेक कारण असल्याने विविध स्तरांतून याचा तीव्र विरोध होत होता . गडचांदूर नगरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ .सविता टेकाम यांना गडचांदूरच्या जनतेनी मोठ्या विश्वासाने शहराच्या विकासासाठी निवडून दिले आहे, त्यांनी जनहित लक्षात घेऊन दारू दुकानाला नाहरकत देऊ नये अशी मागणी आहे गडचांदूर शहराच्या लोकसंख्या च्या तुलनेत आता शहरात असणारी दारू दुकानें भरपूर आहेत .नगरपरिषद ने शहरातील महिला ,लहान मुले ,विधार्थी -विध्यर्थीनींचा विचार करता पुन्हा कुठल्याही दारू दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न करू नये .