लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत राजुरा तालुक्यातील मौजा पिंपळगाव ते डोंगरगाव – विरुर – सिंधी पर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करणे, लांबी 11.55 किमी, अंदाजे किंमत 3 कोटी 21 लक्ष रुपये. खांबाळा ते विरूर – चिंचाळा रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, लांबी 6.37 किमी, किंमत 2 कोटी 94 लक्ष रुपये निधीच्या विकासकामांचे भूमिपूजन लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कृ.उ.बा.स माजी सभापती आबाजी पाटील ढुमने, उपसभापती मंगेश गुरणुले, माजी सभापती तथा प स सदस्य कुंदाताई जेणेकर, प स सदस्य तुकाराम मानुसमारे, प स सदस्य रामदास पुसाम, सरपंच शोभा रायपल्ले, सरपंच भाग्यश्री आत्राम, उपसरपंच रामभाऊ ढुमने, उपसरपंच विकास देवाळकर, ग्रा प सदस्य उज्वला दामेलवार, सोमबाई सिडाम, अनिल कोडापे, मधुकर धानोरकर, पोलीस पाटील सुनिता धानोरकर, बबन ताकसांडे, लटारू नारनवरे, नानाजी ढवस, अजय रेड्डी, राकेश रामटेके, विजय देठे, इरफान शेख, इर्शाद शेख, विलास आकेवार, फिरोज शेख, राजु दामेलवार, मंगेश रायपल्ले, धनराज चिंचोलकर, राजकुमार ठाकूर, भास्कर मोरे, दाऊजी ठेंगरे, किसन बोबडे, क्षिधर झुरमुरे, गुणवंत मोरे यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.