लोकदर्शन 👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :- ११/०१/२०२२ :-* दक्षिण सोलापुर तालुका कुंभारी येथे बेघर महिला विडी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या माँ साहेब घरकुल वसाहतीत महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाकडून पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते श्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत मंजुर करून त्याचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
दक्षिण सोलापुर कुंभारी येथे माँ साहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वतीने बांधण्यात आलेल्या विडी घरकुल वसाहतीत त्यासह इतर रहिवासी साठी पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण समारंभ महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री श्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन बैठकीत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री गुलाबराव पाटील साहेबांनी लोकार्पण केले या पाणी पुरवठा योजनेमुळे माँ साहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेसह गोदुताई परुळेकर संस्था , स्वामी समर्थ गृहनिर्माण संस्था , माँ साहेब गृहनिर्माण संस्था अ , ब , क अशा सर्व वसाहतींना पाणी पुरवठा होणार आहे . म्हणजेच नविन विडी घरकुल वसाहतीतील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे . असे माँ साहेब गृहनिर्माण संस्थेचे संस्थापक श्री . विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन मा.ना. श्री गुलाबराव पाटील साहेब , पाणी पुरवठा मंत्रालय प्रधान सचिव कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात, कामगार राज्यमंत्री श्री बच्चु कडू, नाशिक आदिवासी भागातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, सोलापूर जिल्हाप्रमुख – गणेश ( दादा ) वानकर, माँ साहेब संस्थेचे संस्थापक – श्री विष्णु कारमपुरी (महाराज) व व्यवस्थापक श्रीनिवास चिलवेरी माजी आमदार व गोदुताई परळेकर , विडी घरकुलचे संस्थापक श्री . नरसय्या आडम ( मास्तर ) आदिनी सहभाग घेतला .
या ऑनलाईन बैठकीत माजी आमदार नरसय्या आडम मास्तर व विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी गरीब महिला विडी कामगाराचा वसाहतीस पाणी पुरवठा योजनेस मंजुरी दिल्याने मा . आदित्यजी ठाकरे साहेब , मा . गुलाबराव पाटील साहेब ठाकरे सरकार आणि महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले सदर ऑनलाईन बैठक 1:30 वाजल्यापासुन 2:30 वाजे पर्यंत असा एक तास चालला.=============================
*सोलापूर कुंभारी येथील माँ साहेब विडी घरकुल वसाहतीसाठी पाणी पुरवठा मंत्रालयाकडून ऑनलाईन बैठकीत भाग घेऊन बोलताना विष्णु कारमपुरी (महाराज),-व श्रीनिवास चिलवेरी, आदी उपस्थित आहेत.*