लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,
कोरोना विषाणू चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात येत आहेत,
7 जानेवारी ते 10 जानेवारी पावेतो स्थानिक महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे लसीकरण केंद्र सुरू करून 11 वी 12 वी च्या कला,विज्ञान, व एम, सी,व्ही, सी,च्या एकूण 684 विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण करण्यात आले,तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्वप्नील टेम्भे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण करण्यात आले, प्राचार्या सौ,स्मिता चिताडे ,उपप्राचार्य विजय आकनूरवार,एम,सी,व्ही, सी,विभागाचे प्रमुख प्रा, अशोक डोईफोडे,जेष्ठ प्रा, प्रफुल्ल माहुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण ला प्रारंभ करण्यात आला, लसीकरण करण्यासाठी आरोग्य अधिकारी डॉ, दीक्षा ताकसांडे,सेवाकर टोंगे, पवन ताजने ,प्रणाली बावणे,ज्योत्स्ना वैद्य यांनी मोलाचे योगदान दिले,
लसीकरण अभियान यशस्वी रीतीने राबविण्यासाठी शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले,